Monday, September 01, 2025 09:15:15 AM

PM Modi Visit to Japan: जपान दौऱ्यात पंतप्रधान मोदींना मिळाली 'दारुमा बाहुली'ची खास भेट; जपानी संस्कृतीत का मानली जाते शुभ? जाणून घ्या

ही बाहुली झेन बौद्ध परंपरेचे संस्थापक बोधिधर्म (दारुमा दैशी) यांच्यावर आधारित आहे. जपानी लोक एखादे ध्येय ठरवताना बाहुलीचा एक डोळा रंगवतात आणि ध्येय पूर्ण झाल्यावर दुसरा डोळा रंगवतात.

pm modi visit to japan जपान दौऱ्यात पंतप्रधान मोदींना मिळाली दारुमा बाहुलीची खास भेट जपानी संस्कृतीत का मानली जाते शुभ जाणून घ्या

PM Modi Visit to Japan: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी जपान दौऱ्यावर असताना दारुमा-जी मंदिराचे मुख्य पुजारी रेव्ह. सेशी हिरोसे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांना दारुमा बाहुलीची विशेष भेट देण्यात आली. दारुमा ही जपानी संस्कृतीतील पारंपारिक बाहुली असून ती शुभेच्छा, चिकाटी आणि ध्येयसिद्धीचे प्रतीक मानली जाते. ही बाहुली झेन बौद्ध परंपरेचे संस्थापक बोधिधर्म (दारुमा दैशी) यांच्यावर आधारित आहे. गोलाकार आणि पोकळ स्वरूपामुळे ती नेहमी उभी राहते. जपानी लोक एखादे ध्येय ठरवताना बाहुलीचा एक डोळा रंगवतात आणि ध्येय पूर्ण झाल्यावर दुसरा डोळा रंगवतात. त्यामुळे ही बाहुली सातत्याने प्रयत्न करण्याची आठवण करून देते.

हेही वाचा -Mahua Moitra On Amit Shah: अमित शाहांचे डोके कापून टेबलावर ठेवले पाहिजे; महुआ मोईत्रा यांचे वादग्रस्त वक्तव्य 

दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी 15 व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. दौऱ्यादरम्यान त्यांनी जपानचे माजी पंतप्रधान योशिहिदे सुगा आणि फुमियो किशिदा यांचीही भेट घेतली. या भेटीत तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली.

हेही वाचा - Congress Darbhanga Rally: पंतप्रधान मोदींच्या आईला शिवीगाळ करणाऱ्या तरुणाला अटक; राहुल गांधींवरही गुन्हा दाखल

मोदींनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, योशिहिदे सुगा यांच्यासोबत भारत-जपान सहकार्याच्या विविध आयामांवर चर्चा झाली. आमच्या चर्चेत तंत्रज्ञान, एआय, व्यापार आणि गुंतवणुकीत सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. जपानकडून मिळालेली ही भेट भारत-जपान मैत्रीचे प्रतीक मानली जात आहे.


सम्बन्धित सामग्री