Sunday, August 31, 2025 09:36:27 PM

Delhi elections 2025 result: "अण्णा हजारे भाजपचे…" शरद पवार गटाच्या नेत्याची टीका

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या दारूण पराभवानंतर अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. अण्णा हजारेंच्या या टीकेवर शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

delhi elections 2025 result quotअण्णा हजारे भाजपचे…quot शरद पवार गटाच्या नेत्याची टीका

दिल्लीत विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारली. तब्बल २७ वर्षांनंतर भाजपला दिल्लीत सत्ता काबीज करता आली. दुसरीकडे सत्ताधारी आम आदमी पार्टीला मात्र पराभवाचा जोरदार दणका बसला. नवी दिल्लीत भाजपने ४८ जागांवर मुसंडी मारली असून दिल्लीत भाजपची एकहाती सत्ता येणार हे निश्चित आहे. दिल्लीत आपच्या दारूण पराभवानंतर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. अण्णा हजारेंच्या या टीकेवर शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

आमदार उत्तम जानकर यांनी पंढरपुरात पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालावर भाष्य केले. ते म्हणाले की, दिल्ली विधानसभेचा निकाल मला जसा आपेक्षित होता. तसाच १०० टक्के आला. भाजपवाले केजरीवाल यांचा पराभव करणार तसेच निवडून येणाऱ्या २५ जागाच केजरीवालांच्या आप’ला ठेवणार. उर्वरित सगळ्या जागांवर भाजपवाले सेटिंग, प्रोग्रामिंग करणार आहेत. त्यावरच त्यांचा फोकस आहे, याची हिंट मी आधीच दिली होती. 

दिल्ली विधानसभेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या असत्या तर निकाल हे वेगळे असते. दिल्लीत एकही जागेवर भाजपचा उमेदवार निवडून आला नसता. भाजपच्या शून्य जागा आल्या असत्या. तर आपने ६० जागांवर विजय मिळवला असता. काँग्रेस ७ ते ८ जागांवर विजयी झाली असती, असा दावाही देखील आमदार जानकर यांनी केला. 

 

अण्णा हजारे भाजपचे सदस्य – जानकर

पत्रकारांनी अण्णा हजारेंविषयी प्रश्न विचारले असता जानकर म्हणाले की, अण्णा हजारे हे अण्णा हजारे राहिले नाहीत. ते भाजपच्या विचाराचे झाले आहेत. आता अण्णा हजारे तटस्थ नसून ते भाजपचे सदस्य आहेत, असा आरोप जानकर यांनी केला.  


अण्णा हजारे केजरीवाल बाबात काय म्हणाले 

मी बऱ्याच काळापासून म्हणत आहे की, निवडणूक लढवताना उमेदवाराचे चारित्र्य, चांगले विचार असले पाहिजेत. त्याची प्रतिमा मलीन होऊ नये. पण, केजरीवाल यांना हे समजले नाही. ते दारू आणि पैशात अडकले. 'दारू आणि पैशांच्या गैरव्यवहारामुळे ते बदनाम झाले. यामुळे अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा मलीन झाली आणि त्यामुळेच त्यांना निवडणुकीत कमी मते मिळत आहेत, अशी टीका अण्णा हजारेंनी केजरीवाल यांच्यावर केली.  

सद्याच्या घडीला देशाची लोकशाही वाचवणे गरजेचे आहे. त्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. आता बिहारसह इतर राज्यातील निवडणुकीच्या आधी त्या त्या राज्यात जाऊन EVM च्या विरोधात जनजागृती करणार असल्याचे देखील जानकर म्हणाले. दरम्यान, भाजप दिल्लीत ३६ जागांवर विजयी झाली आहे. तर १० जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत.

 


सम्बन्धित सामग्री