Thursday, August 21, 2025 12:39:10 AM

विरारमध्ये डिलिव्हरी बॉयचे घाणेरडे कृत्य; लिफ्टमध्ये केली लघूशंका

ब्लिंकिट या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठी काम करणाऱ्या एका डिलिव्हरी बॉयला इमारतीच्या लिफ्टमध्ये लघवी करताना पकडण्यात आले आहे. हा घृणास्पद प्रकार लिफ्टमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला

विरारमध्ये डिलिव्हरी बॉयचे घाणेरडे कृत्य लिफ्टमध्ये केली लघूशंका
Delivery boy urinated in lift
Edited Image

पालघर: विरारमधून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. ब्लिंकिट या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठी काम करणाऱ्या एका डिलिव्हरी बॉयला इमारतीच्या लिफ्टमध्ये लघवी करताना पकडण्यात आले आहे. हा घृणास्पद प्रकार लिफ्टमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. ही घटना 18 जुलै रोजी विरार पश्चिमेतील सीडी गुरुदेव इमारतीत घडली आहे. या प्रकरणी संबंधित डिलिव्हरी बॉयविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीटीव्हीत घृणास्पद कृत्य कैद - 

प्राप्त माहितीनुसार, 18 जुलै रोजी दुपारी ही घटना घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसते की, डिलिव्हरी एजंट डाव्या हातात पार्सल घेऊन लिफ्टमध्ये प्रवेश करतो. त्यानंतर तो जाणूनबुजून कॅमेऱ्याकडे पाठ फिरवतो आणि लिफ्टच्या कोपऱ्यात उभा राहून लघूशंका करतो. इमारतीच्या लिफ्टमध्ये दुर्गंधी येऊ लागल्याने रहिवाशांनी सीसीटीव्ही तपासले. त्यानंतर हा धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार समोर आला आहे.

हेही वाचा -  11 वर्षीय मुलावर पिटबुलचा हल्ला; निर्दयी मालक फक्त मजा पाहत राहिला

दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रहिवाशांनी ब्लिंकिटच्या विरार कार्यालयात जाऊन संबंधित डिलिव्हरी बॉयला जाब विचारला. यावेळी झालेल्या गोंधळात काही लोकांनी आरोपीला मारहाण देखील केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

हेही वाचा -  इंडोनेशियात 280 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या जहाजाला भीषण आग, पहा व्हिडिओ

विरारमध्ये डिलिव्हरी बॉयने लिफ्टमध्ये केली लघवी - 

डिलिव्हरी बॉयविरोधात गुन्हा दाखल - 

याप्रकरणी बोलिंज पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून इमारतीतील इतर रहिवाशांचे जबाब नोंदवत आहे. घटनेनंतर सोशल मीडियावर लोकांनी ब्लिंकिटवरही नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी कंपनीकडून कडक पडताळणी प्रक्रिया आणि प्रशिक्षणाची मागणी केली आहे. अद्याप ब्लिंकिटकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही.


सम्बन्धित सामग्री