महाराष्ट्र: महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यातच आता महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्राच्या राजकारणात सद्या गाण्यांची मैफिल रंगलीय. गाण्यांच्या माध्यमातून एकमेकांवर वार पलटवार होत असल्याचं पाहायला मिळतंय. विनोदी कलाकार कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक गाणं गेल्याने याचे पडसाद राजकारणात उमटू लागलेत. कुणाल कामराने गायलेलं गाणं ठाकरे गटाच्या नेत्यांनी पुन्हा गाऊन शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न केलाय.
हेही वाचा: पुण्यातील बॅनर ठरताय चर्चेचा विषय
ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी या गाण्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीय. यानंतर आता यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलीय 'गद्दार कोण याचा निकाल जनतेने दिलाय' असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना टोला लगावलाय. कुणाल कामराने गायलेलं गाणं सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंना चांगलेच धारेवर धरले होते. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.
दरम्यान पुण्यामध्ये देखील याचे पडसाद उमटतांना पाहायला मिळताय. पुण्यातील अलका टॉकीज चौकात ठाकरे गटाने हे बॅनर लावले असून यामुळे शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. ठाणे, रिक्षा, चष्मा, दाढी, गुवाहाटी आणि गद्दार या शब्दांना महारष्ट्रात बंदी आहे का? अशा आशयाचे ह्या बँनरचे स्वरूप असून हे बॅनर चर्चेचा विषय ठरताय. यानंतर आता 'गद्दार कोण याचा निकाल जनतेने दिलाय' अशी प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना टोला लगावलाय.