Thursday, August 21, 2025 12:03:11 AM

धनंजय मुंडेंचा राजीनामा नैतिकतेला धरुन; मुंडेंच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंडेंच्या राजीनाम्यावर एक पत्रक जारी करण्यात आले आहे.

धनंजय मुंडेंचा राजीनामा नैतिकतेला धरुन मुंडेंच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण

मुंबई : बीडमधील मस्साजोगचे सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी निघाला. त्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आणि अखेर आज मुंडेंनी मुख्यमंत्र्यांजवळ राजीनामा सुपूर्द केला. यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंडेंच्या राजीनाम्यावर एक पत्रक जारी करण्यात आले आहे. 


दोषींवर कठोर कारवाई व्हावी ही राष्ट्रवादीची आधीपासूनच स्पष्ट भूमिका असल्याचे पत्रकात म्हटले आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा नैतिकतेला धरुन आहे. संतोष देशमुख हत्येचा तपास कोणत्याही दबावाशिवाय सुरु असल्याचे राष्ट्रवादी पक्षाने सांगितले आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं अधिक भाष्य करणं चुकीचं आहे. कोणत्याही गुन्हाला, गैरकृत्याचं राष्ट्रवादी समर्थन करणार नाही. धनंजय मुंडेंचा प्रकरणाशी संबंध नाही, मात्र नैतिकतेच्या मुद्यावर मुंडेंचा राजीनामा दिला असल्याचे पक्षाने पत्रकात म्हटले आहे. 

हेही वाचा : Dhananjay Munde Statement: राजीनाम्यानंतर मुंडेंनी पोस्टमधून दिले कारण; काय म्हणाले?

अजित पवारांनी याआधीही नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा दिला होता. न्यायव्यवस्था आणि कायदयावर आमचा पूर्ण विश्वास आहे. न्यायाला विलंब होऊ नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहे असे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी पक्षाकडून स्पष्टीकरण देण्यात आले.
मुंडेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीने पत्रक जारी केले. या पत्रकात त्यांनी दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे असा उल्लेख केला. धनंजय मुंडेंचा नैतिकतेला धरुन राजीनामा आहे. धनंजय मुंडेंचा प्रकरणाशी संबंध असल्याचं समोर आलेलं नाही. जबाबदार राजकीय नेता म्हणून मुंडेंनी राजीनामा दिला असे अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने पत्रकात म्हटले आहे. तसेच याआधी अजित पवारांनी नैतिकतेच्या मुद्दयावर राजीनामा देऊन उदाहरण निर्माण केलं अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी पक्षाकडून घेण्यात आली आहे. 

हेही वाचा : Pankaja Munde Statement: मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंनी केले भाष्य
राजीनाम्यानंतर मुंडेंची प्रतिक्रिया
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे.


सम्बन्धित सामग्री