Thursday, August 21, 2025 12:04:29 AM

लातूरमध्ये 17 कोटींचं ड्रग्ज सापडलं; प्रकरणात पोलिसाचा सहभाग उघड

लातूरमध्ये ड्रग्जचा पर्दाफाश केल्याचे पाहायला मिळत आहे. लातूर जिल्ह्यातून 17 कोटींचे 11.66 किलो मेफेड्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.

लातूरमध्ये 17 कोटींचं ड्रग्ज सापडलं प्रकरणात पोलिसाचा सहभाग उघड

लातूर : लातूरमध्ये ड्रग्जचा पर्दाफाश केल्याचे पाहायला मिळत आहे. लातूर जिल्ह्यातून 17 कोटींचे 11.66 किलो मेफेड्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईत पोलीस हवालदार प्रमोद केंद्रेसह ड्रग्ज तस्कर व वितरक अशा सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या सहा जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या ड्रग्स प्रकरणात पोलिसाचा सहभाग उघड झाला आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरारच्या पोलिसाचा सहभाग आहे.  

महाराष्ट्रातील लातूरमध्ये 17 कोटी रुपयांच्या मेफेड्रोन म्हणजेच एमडी बाळगल्याच्या आरोपाखाली मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद केंद्रे आणि इतर सहा जणांना अटक करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) मुंबईने त्यांच्या प्रादेशिक युनिट्सशी समन्वय साधून या प्रदेशातील एक गुप्त मेफेड्रोन उत्पादन सुविधा उघडकीस आणली आणि ती उध्वस्त केली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही माहिती अधिकाऱ्यांनी 9 एप्रिल रोजी दिली आहे.

हेही वाचा : 'ईएसआयसी रुग्णालयासाठी पालघर येथे जागा देणार'

महसूल गुप्तर संचालनालयाने अर्थात डीआरआयच्या पथकाने केलेल्या कारवाईत पोलीस हवालदार प्रमोद केंद्रेसह सहा आरोपींना अटक केली आहे. ड्रग्ज रॅकेटमधील सहा आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. डीआरआयने केलेल्या कारवाईत 17 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. तर 11.66 किलो मेफेड्रोन ड्रग्ज सापडले आहेत. 

प्रमोद केंद्रेने काय केले?
पोलिस खात्यात प्रमोद केंद्रे हा पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहे.  पोलीस हवालदार प्रमोद केंद्रेने आपल्या मूळ गावी चाकूर तालुक्यातील रोहिना या गावातील डोंगराळ परिसरात मेफेड्रोन ड्रग्ज निर्मितीचा कारखाना सूरू केला होता. या प्रकरणात प्रमोद केंद्रेला डीआरआयच्या पथकाने अटक केली असून ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाईंड मुंबईतील असल्याचे समोर आले आहे. हवालदार प्रमोद केंद्रेवर मेफेड्रोन ड्रग्ज तयार करण्याची जबाबदारी होती. या रॅकेटचा आवाका मोठा असण्याचा संशय डीआरआयच्या अधिकाऱ्यांना आहे.

 


सम्बन्धित सामग्री