Wednesday, August 20, 2025 10:09:19 AM

साताऱ्यात पहिल्याच पावसामुळे दणादण; रस्त्यावरून गाडी चालवणं अवघड झाल्याने चक्क बाईकच खांद्यावर उचलली

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच, रस्त्याची अवस्था खराब झाल्यामुळे एका युवकाने आपली दुचाकी खांद्यावर घेऊन रस्ता पार केला.

साताऱ्यात पहिल्याच पावसामुळे दणादण रस्त्यावरून गाडी चालवणं अवघड झाल्याने चक्क बाईकच खांद्यावर उचलली

सातारा: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच, सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात असलेल्या कुळकजाई गावात पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः दैना झाली आहे. रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की, एका युवकाला आपली दुचाकी खांद्यावर घेऊन रस्ता पार करावा लागला. नेहमी आपण दुचाकीवरून रस्ता पार करत असतो, मात्र कुळकजाई येथे पावसामुळे रस्ते पूर्णतः चिखलयुक्त आणि खड्ड्यांनी भरलेले आहेत. अशा परिस्थितीत वाहन चालविणे अशक्य झाले असून, नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याबाबत संबंधित विभागाने त्वरित दखल घ्यावी आणि रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा: ADITYA THACKERAY: आदित्य ठाकरे महायुतीवर आक्रमक

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना 'हा' अलर्ट:

हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना 'रेड अलर्ट', 'यलो अलर्ट' आणि 'ऑरेंज अलर्ट' जारी केले आहेत.

यलो अलर्ट: मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नागपूर आणि इतर अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

रेड अलर्ट: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे.

ऑरेंज अलर्ट: पुणे, सातारा, कोल्हापूर आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

हेही वाचा: वरळी भुयारी मेट्रोमध्ये पाणी शिरल्याबाबत मुंबई मेट्रोने दिले स्पष्टीकरण

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच, पुणे शहरात दहा वर्षांतील सर्वाधिक पाऊस पडला आहे. 1 मे ते 21 मे दरम्यान 110 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी 2015 मध्ये 106 मिमी पावसाची नोंद झाली होती. हवामान खात्याने पुढील दोन दिवसांत आणखी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

हेही वाचा: विक्रमी पावसामुळे मुंबईत रेल्वे वाहतूक आणि विमान वाहतूक प्रभावित

 


सम्बन्धित सामग्री