Wednesday, August 20, 2025 04:33:27 AM

Chhtrapati Sambhajinagar Crime : आईचा मोबाईल देण्यास नकार, अल्पवयीन मुलाची डोंगरावरून उडी

नुकताच, एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आईने मोबाईल घेऊन दिला नाही. त्यामुळे, 16 वर्षीय मुलाने थेट खवडा डोंगरावरून उडी मारली. या घटनेमुळे, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

chhtrapati sambhajinagar crime  आईचा मोबाईल देण्यास नकार अल्पवयीन मुलाची डोंगरावरून उडी

विजय चिडे. प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगर: मोबाईल घेतल्यावर अनेकदा तुम्ही आई-बाबा, शिक्षक, आदींना ओरडताना पाहिलाच असाल. मात्र, त्यामुळे एखादा  मुलगा इतक्या टोकाची भूमिका घेईल, अशी कोणी कल्पनाही करू शकत नाही. नुकताच, एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आईने मोबाईल घेऊन दिला नाही. त्यामुळे, 16 वर्षीय मुलाने थेट खवडा डोंगरावरून उडी मारली. या घटनेमुळे, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

हेही वाचा: Pune News : पुण्यात गणेशोत्सवापूर्वीच विसर्जन मिरवणुकीबाबत वाद?

नेमकं प्रकरण काय?

मृत तरुणाचे नाव अथर्व गोपाल तायडे (रा. जळगाव जामोद, जि. बुलढाणा) येथील रहिवासी आहे. मात्र, तो स्वातिक सिटी, साजापूर शिवार, वाळूज याठिकाणी राहत होता आणि पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेत होता. या दरम्यान, त्याने आईकडे मोबाईल मागितला, मात्र आईने मोबाईल देण्यास नकार दिला. त्यामुळे, रागाच्या भरात अथर्वने तिसगाव येथील खावडा डोंगरावरून उडी मारली. ही घटना पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. या दरम्यान, अतुल आडे आणि स्वप्नील पवार यांनी जखमी अथर्वला तातडीने दवाखान्यात आणले. मात्र, उपाचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर आईने फोडलेला हंबरडा हृदयद्रावक होता. सध्या, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे.


सम्बन्धित सामग्री