रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शासनाने रेशन कार्ड धारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली असून, त्याची अंतिम मुदत 15 मार्च निश्चित करण्यात आली आहे. जर या मुदतीत ई-केवायसी पूर्ण केले नाही, तर सुमारे साडेपाच लाख लाभार्थ्यांना रेशनसाठी अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सर्व नागरिकांनी वेळेत ई-केवायसी करून आपले रेशन सुरळीत चालू ठेवावे.
शासनाने नागरिकांच्या सोयीसाठी 'मेरा ई-केवायसी अॅप' सुरू केले आहे. हे अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून सहज ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे. ई-केवायसी करण्यासाठी धारकांनी या अॅपमध्ये आपला रेशन कार्ड क्रमांक आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक प्रविष्ट करावेत. त्यानंतर आलेला ओटीपी टाकून सबमिट केल्यानंतर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
हेही वाचा: MVA Meeting: महाविकास आघाडीच्या बैठकांचा सिलसिला
जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या मोहिमेत सहभाग घेतला असून, आतापर्यंत 70 टक्के नागरिकांनी ई-केवायसी पूर्ण केले आहे. मात्र, अजूनही 30 टक्के लाभार्थी ई-केवायसीपासून वंचित आहेत. या लाभार्थ्यांनी वेळेत ई-केवायसी पूर्ण न केल्यास त्यांचे रेशन बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उशीर न करता ई-केवायसी पूर्ण करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ई-केवायसी प्रक्रिया जलद आणि सुलभ करण्यासाठी शासनाने ऑनलाइन प्रणालीचा अवलंब केला आहे. त्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज नाही. घरबसल्या मोबाईलच्या मदतीने अवघ्या काही मिनिटांत ई-केवायसी करता येईल. तरीही काही कारणास्तव मोबाईलवर अॅप डाउनलोड करणे शक्य नसेल, तर संबंधित रेशन दुकानात जाऊन किंवा महा-ई-सेवा केंद्रात जाऊन ई-केवायसी पूर्ण करता येईल.
हेही वाचा:संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना पुरस्कार
रेशन कार्ड धारकांसाठी ई-केवायसी ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. शासनाने वेळोवेळी नागरिकांना सूचित करून याबाबत जागरूकता निर्माण केली आहे. मात्र, अद्याप काही नागरिक ई-केवायसी न करता रेशन मिळण्याची वाट पाहत आहेत. असे नागरिक 15 मार्चपूर्वी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून शासनाने दिलेल्या मुदतीचे पालन करावे आणि रेशनचा लाभ सुरू ठेवावा.
रेशन वितरण सुरळीत ठेवण्यासाठी शासनाचा हा निर्णय असून, नागरिकांनी यामध्ये सहकार्य करणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी 'मेरा ई-केवायसी अॅप' चा उपयोग करून किंवा जवळच्या सेवा केंद्रात जाऊन तातडीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.