Encounter on Gadchiroli-Narayanpur Border: गडचिरोली जिल्ह्यातील माओवादविरोधी कारवाईत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. प्राप्त माहितीनुसार, माओवादी कोपर्शी वनक्षेत्रात म्हणजेच गडचिरोली-नारायणपूर सीमेवर लपून बसले होते. यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक (मिशन) एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली सी-60 आणि सीआरपीएफ क्यूएटीच्या दोन पथकांना शोध मोहिमेसाठी रवाना करण्यात आले.
मुसळधार पावसातही कारवाई
सततच्या मुसळधार पावसातही पोलिस पथकाने परिसरात पोहोचून शोध मोहीम सुरू केली. या दरम्यान माओवाद्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तर देत कारवाई केल्याने आठ तासांहून अधिक काळ चकमक सुरू राहिली.
हेही वाचा - Azad Maidan वर आंदोलनाला परवानगी मिळाली! पण, मनोज जरांगे आक्रमक, म्हणाले आता एका दिवसातच...
4 माओवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
या कारवाईत एकूण 4 माओवादी (1 पुरुष आणि 3 महिला) ठार झाले. घटनास्थळावरून 1 एसएलआर रायफल, 2 इन्सास रायफल आणि 1.303 रायफल जप्त करण्यात आली आहे. पोलिसांचे माओवादविरोधी ऑपरेशन अजूनही सुरू असून उर्वरित माओवाद्यांचा शोध घेतला जात आहे.
हेही वाचा - Nagpur-Gondia Expressway: नागपूर-गोंदिया एक्सप्रेसवे प्रकल्पाला हिरवा कंदील; 3 तासांचा प्रवास फक्त 75 मिनिटांत पूर्ण होणार
नक्षलमुक्त भारताकडे वाटचाल
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एप्रिल 2025 मध्ये स्पष्ट केले होते की, भारत नक्षलमुक्त करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. 31 मार्च 2026 पर्यंत नक्षलवादाचा संपूर्ण उच्चाटन करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचेही अमित शहा यांनी यापूर्वी स्पष्ट केलं आहे.