मुंबई : शक्तिपीठ महामार्गाविरोधात हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी एल्गार मोर्चा काढला आहे. शक्तिपीठ महामार्ग कदापी होऊ देणार नाही, असा एल्गार पुकारत आज शेतक-यांचा महामोर्चा आझाद मैदानात धडकला आहे. 12 जिल्ह्यांतील हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झालेत. या मोर्चात अंबादास दानवे, सचिन अहिर, कैलास पाटील, जयंत पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी मोर्चात सहभागी आहेत.
सरकार नवे नवे रस्ते करण्यात का इंट्रेस्ट घेतं हे कळत नाही. मोठे प्रकल्प घ्यायचे त्यातून निधी उपलब्ध करायचा. राजू शेट्टी यांना माहिती आहे निवडणुकीमध्ये किती पैसे वाटले जातात. त्यांना चांगला अनुभव आहे. विकासासाठी आमचा विरोध नाही. पण ज्याची जमीन जात असेल त्यांची उपजिका संपून जाईल. इकडे तिकडे असं करू नका. सरकार पैसे देते मग मॅनेज होत असाल तर व्हा असे पवार गटाचे जयंत पाटील यांनी सांगितले. त्यावर आम्हाला जमीन वाचवायची आहे पैसे नको असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. आम्ही भाषण करुन दमलो कारण लोकांना पैसे देऊन शांत केले जाते. निर्धाराने आलात तर निर्धार टिकला पाहिजे. मोठी साखळी महाराष्ट्रात निर्माण झाली असल्याचे शरद पवार गटाच्या जयंत पाटलांनी म्हटले आहे.
हेही वाचा : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 26 मार्चला होणार
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते तथा उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंकडून एकनाथ शिंदेचा व्हिडिओ सादर करण्यात आला. शक्तीपीठ नको असेल तर सरकार तुमच्या मनाविरोधात काम करणार नाही. या आशयाचा व्हिडिओ अंबादास दानवेंकडून सादर करण्यात आला आहे. या सरकारचं कंत्राट दारांशी घेणदेणंं आहे. जनतेच्या भावना चिरडायच्या आहेत. या लढ्यामागे आम्ही सगळे खंबीरपणे पाठीशी उभे राहू असेही अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांना संबोधित करताना सतेज पाटील म्हणाले, शक्तिपीठ बद्दल राज्यशासनाच्या भूमिका वेगवगेळ्या होत्या. लोकसभेला निकाल लागला आणि शेतकऱ्यांचा राग निवळला असा भ्रम निर्माण केला. कोल्हापूरपुरता हा रस्ता रद्द असल्याचा संभ्रम निर्माण सरकारने केला. मात्र पूर्ण रस्त्याला विरोध असल्याचे सर्वांनी सांगितले. 86 हजार कोटी वसूल करायला 28 वर्षे लागतील. शक्तिपीठाला पाठिंंबा करण्यासाठी त्या मार्गातील मंदिरांना दोन ते तीन कोटी द्या म्हणजे तिथे येणाऱ्या भक्तना चांगली सुविधा मिळेल, अशी मागणी सतेज पाटलांनी केली. आम्ही तुमच्या पुढे दोन पाऊले आहोत. सोलापूर सांगोलाचे अनेक शेतकरी आलेत. जे गरजेचे आहे त्याला शेतकऱ्यांनी विरोध केला नाही. मात्र हा रस्ता गरजेचा नाही त्यामुळे ह्याला विरोध आहे. कोल्हापूरचा निर्णय झाला असला तरी इतर जिल्ह्याच्या पाठीमागे आम्ही ठाम उभे आहोत. कोणी घरी जायला तयार राहू नका मुक्काम करा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यायचा आहे. निर्णय घेऊन घरी जाऊ असे सतेज पाटील यांनी म्हटले.
शेतकऱ्यांचा विरोध मग सरकारचा हट्ट का ? असा सवाल वडेट्टीवारांनी शक्तिपीठ महामार्गावरुन सरकारला केला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी. आम्ही हा महामार्ग होऊ देणार नाही अशी विरोधी भूमिका विजय वडेट्टीवारांनी घेतली आहे.