Wednesday, August 20, 2025 10:11:18 AM

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

तब्बल 28 वर्षानंतर माजी आमदार रवींद्र दंगेकर स्वगृही म्हणजेच शिवसेना पक्षामध्ये परतले आहेत.

काँग्रेसला मोठा धक्का माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
Ravindra Dhangekar Joins Shiv Sena
Edited Image

Ravindra Dhangekar Joins Shiv Sena:  महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. तब्बल 28 वर्षानंतर माजी आमदार रवींद्र दंगेकर स्वगृही म्हणजेच शिवसेना पक्षामध्ये परतले आहेत. धंगेकर काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू होती. 2023 मध्ये त्यांनी कसबा विधानसभा पोटनिवडणूक जिंकली पण लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत धंगेकर कसबा मतदारसंघातून भाजपच्या हेमंत रासने यांच्याविरुद्ध पराभूत झाले. सोमवारी दुपारी त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसेच एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीनंतर आपला निर्णय सांगणार असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं होतं. त्याप्रमाणे, आज त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह शिंदे गट शिवसेनेत प्रवेश केला.

कसबा हा पुण्यातील भाजपचा हक्काचा मतदार संघ म्हणून ओळखला जात होता. अनेक वर्ष स्वर्गीय गिरीश बापट या मतदारसंघाचे नेतृत्व करत होते. कसब्यात भाजपाने आपला उमेदवार नेहमीच विजयी केला होता. त्याप्रमाणे मुक्ता टिळक येथून आमदार झाल्या होत्या. परंतु कर्करोगाने त्यांचे निधन झाल्याने या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. येथे रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आणि ते अल्पावधीतच महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले होते. 

हेही वाचा - मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट आवश्यक

गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील अनेक प्रकरणावर आवाज उठवणारे लोकप्रतिनिधी म्हणून रवींद्र धंगेकर यांची ओळख तयार झाली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मागील काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्याबरोबरच्या फोटोवरून ते काँग्रेस सोडतील अशा चर्चा होत्या. आज अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या आहे. आज रवींद्र धंगेकर यांनी थेट शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला.

हेही वाचा -  Maharashtra Budget 2025: हा बोगस अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंची महायुतीवर टीका   

रवींद्र धंगेकर यांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. आज सकाळी रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडताना वाईट वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली होती. निवडणुकीत सर्वांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली, परंतु माझ्या समर्थकांची आणि मतदारांची भावना अशी आहे की मी असा निर्णय घ्यावा ज्यामुळे शहराच्या विकासकामांना चालना मिळेल, असंही रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं होतं. 
 


सम्बन्धित सामग्री