अमरावतीच्या ब्राह्मणवाडा थडी येथील ग्रामपंचायत सरपंच पद्मा मेसकर आणि विरोधी गटाचे ग्रामपंचायत सदस्य राजू उल्ले यांच्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयातच फ्रीस्टाइल हाणामारी झाली आहे. एकमेकांना मारहाण करत असल्याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. सरपंच यांना विश्वासात न घेता जागेचा नमुना आठ अ फेरफारच्या वादावरून ही हाणामारी झाल्याचे समजते. सुरुवातीला एक महिला एका पुरुषाच्या कानशिलात लगावते. नंतर तो पुरुष महिलेला मारहाण करतो. त्यानंतर पुन्हा महिला त्या पुरुषाला मारहाण करते, हे दृश्य ग्रामपंचायत कार्यालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. यासंदर्भात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.