Monday, September 01, 2025 06:56:42 AM

कल्याणमधील रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण प्रकरणी मुजोर गोकुळ झा याला अखेर अटक

कल्याणमधील रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण प्रकरणी मुजोर गोकुळ झा याला अखेर अटक

 

कल्याणमधील रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण प्रकरणात मुजोर गोकुळ झा याला अखेर अटक करण्यात आली आहे. गोकुळ याने रुग्णालयात तरुणीला बेदम मारहाण केली होती. या प्रकरणाची दखल मनसेने घेतली. मनसे पदाधिकाऱ्यांनी गोकुळ झा याला चांगलीच अद्दल घडवली आहे.  मनसेने  पदाधिकाऱ्यांनी झा याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 
कल्याणमध्ये रिसेप्शनिस्टने थांबायला लावले म्हणून तरुणाने मारहाण करण्यात सुरुवात केली. भयावह पद्धतीने तरुणाने तरुण रिसेप्शनिस्टला जबर मारहाण केली आहे. या मारहाणीनंतर आरोपी गोकुळ झा फरार झाला. त्यानंतर आता तो पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. मनसे नेते पदाधिकारी योगेश गव्हाणे यांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. अखेर आता पोलिसांनी गोकुळला अटक केली आहे. 
 


सम्बन्धित सामग्री