जळगाव: मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचा परिणाम सोन्याच्या दरावर होत आहे. आता सोन्याच्या दराने आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्या लोकांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे.
सोन्याच्या दरात वाढ
जागतिक स्तरावर सुरु झालेल्या सुद्धजन्य परिस्थितीचा मोठा परिणाम आता भारतीय बाजारपेठेवर स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेषत: सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये उसळी पाहायला मिळत आहे. आज जळगावसह देशभरात सोन्याच्या दरांनी ऐतिहासिक शिखर गाठले आहे. प्रथमच सोन्याचा दर जीएसटी वगळता प्रतिमहा 1,00,000 रुपये ग्रॅम इतका झाला आहे. जीएसटीसह हा दर 1,03,000 रुपये ग्रॅम नोंदवण्यात आला आहे.
हेही वाचा: पीडित विजय घाडगेंचा सूरज चव्हाणांवर गंभीर आरोप; काय म्हणाले विजय घाडगे?
चांदीच्या दरात उसळण
जागतिक युद्ध परिस्थितीमुळे फक्त सोनेच नाही तर चांदीच्या किंमतींमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. जळगावच्या बाजारात चांदीचा दर प्रतिकिलो 1,18,000 रुपये इतका नोंदवला गेला आहे. हा दर आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे. या वाढीमागे केवळ जागतिक संघर्षच नाही, तर भारत सरकारने अलीकडेच लागू केलेल्या आयात टॅरिफमधील बदलांचाही मोठा परिणाम आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेले युद्ध अद्याप थांबण्याची काही चिन्हे दिसत नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातही अस्थिरता कायम आहे. त्याशिवाय ट्रेड वॉरचंही सावट आहे. त्याचा थेट परिणाम भारतातील गुंतवणूकदारांच्या मन:स्थितीवर आणि मौल्यवान धातूंच्या दरावर होत आहे.