मुंबई : राज्याचे पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराजे देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लबोल केला आहे. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक असल्याचे म्हटले. यावर हे फक्त पाहुणे कलाकारासारखे आले अशी टीका मंत्री शंभूराजे देसाई यांनी केली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा वर्षाव केला आहे.
पर्यटन मंत्री शंभुराजे देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांना उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारले. त्यावर हे फक्त पाहुणे कलाकारासारखे आले. 10 ते 15 मिनिटांसाठी ते यायचे. त्यांनी त्यामध्ये एकदा भाग घेतला असता तर त्यांना विषय समजले असते. विधानसभेमध्ये युवराज आदित्य ठाकरे प्रमुख आहे आणि परिषदमध्ये उद्धव ठाकरे प्रमुख आहे. हे दोघे किती वेळ उपस्थित होते. त्याचे तुम्ही वेळ बघून घ्या. अधिवेशनात त्यांनी कुठेही भाग घेतला नाही. जर कामकाजामध्ये भाग घेतला असता तर त्यांना विषय त्यांना समजलं असतं असा हल्लाबोल शंभुराजेंनी उद्धव ठाकरेंवर केला.
हेही वाचा : देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा; धनंजय देशमुखांची मागणी
पुढे बोलताना, आम्ही त्याचे खूप आभार करतो. पण आमच्याकडे जो पक्ष आहे. तो कायदेशीर आमच्याकडे आहे. न्यायालयानेदेखील आम्हाला योग्य ठरवले. जनतेने आम्हाला मत दिले. त्यांचे बोटावर मोजू ऐवढे सुद्धा आमदार निवडून आले नाहीत. त्यांना का सर्व सोडून जात आहेत. आम्ही जर गद्दार असतो. तर लोकांनी आम्हाला निवडून आणले नसते. आमच्याकडे रोज पक्ष प्रवेश होत आहे. त्याकडे का होत नाही याचे त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. शेवटी त्यांच्याकडे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे उरतील आणि ते दोघे आपले मत एक दुसऱ्याला मांडतील असा उपहासात्मक टोला त्यांनी ठाकरेंना लगावला आहे.
2019 मध्ये तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवली पण तुम्ही विरोधीपक्षाबरोबर युती केली. आम्ही आमच्या मतदारसंघात गेल्यावर लोक विचारायचे की तुम्ही कॉंग्रेसबरोबर का युती केली. अखेर आम्ही अडीच वर्षाने आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडलो असेही शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.