पालघर: पालघरमधून अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. शुक्रवारी दुपारी बोईसरमध्ये महावीर कुंज इमारतीजवळील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात 3 लहान मुलांचा बुडून मृत्यू झाला. दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने गणेश नगर परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांची ओळख पटली आहे. यात सूरज यादव (6) आणि धीरज यादव (12) हे दोघेही भावंडे होते, त्यांच्या शेजाऱ्याचा मुलगा अंकित (12) यांचा मृत्यू झाला आहे. तथापी, चौथा मुलगा थोडक्यात बचावला. घटनास्थळी असलेल्या सतर्क नागरिकांनी त्याचे प्राण वाचवले.
हेही वाचा - Drug-free Nashik: नाशिकमध्ये अमलीपदार्थ विरोधी मोहिमेचे यश; सहा महिन्यात 314 ग्रॅम एमडी ड्रग्ज, 37 किलो गांजा जप्त
पाण्याची खोली न समजल्याने तिनही मुलं बुडाली -
प्राप्त माहितीनुसार, महावीर कुंज इमारतीजवळील खाजगी मालकीच्या भूखंडावर असलेला हा खोल खड्डा कचराकुंडी खोदल्यामुळे तयार झाला. तथापी, यात पावसामुळे पाणी साचले होते. वृत्तानुसार, स्थानिक मुले आंघोळीसाठी या जागेचा वारंवार वापर करत असतं. तथापि, पाण्याची खोली किती आहे याचा अंदाज न आल्याने तिन्ही मुले बुडाली.
हेही वाचा - मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात 29 जूनला मेगा ब्लॉक; अनेक गाड्यांच्या मार्गात बदल
दरम्यान, या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलिस आणि औद्योगिक अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शोध मोहिमेनंतर तिन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला असून कारवाईची मागणी केली आहे.