Wednesday, August 20, 2025 09:24:15 AM

Mumbai Weather Update: पावसाचा जोर कायम! मुंबईत ऑरेंज तर रायगडमध्ये रेड अलर्ट जारी

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठीही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तथापी, मुंबई महानगरपालिकेने पुढील तीन दिवस भरती-ओहोटीचा इशारा दिला आहे.

mumbai weather update पावसाचा जोर कायम मुंबईत ऑरेंज तर रायगडमध्ये रेड अलर्ट जारी
Mumbai Weather Update
Edited Image

Mumbai Weather Update: मुंबई आणि आजूबाजूच्या महानगरांमध्ये सलग चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरूच आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) शुक्रवार 25 जुलै रोजी मुंबई आणि ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर रायगडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तथापी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठीही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईचा हवामान अंदाज -  

स्थानिक हवामान अंदाजानुसार, पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी आकाश सामान्यतः ढगाळ राहील आणि मध्यम पाऊस पडेल. तसेच रात्री/सकाळी काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31 अंश सेल्सिअस आणि 24 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा - Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 25 जुलै रोजी 24 तासांची पाणीकपात जाहीर

बीएमसीकडून भरती-ओहोटीचा इशारा:

तथापी, मुंबई महानगरपालिकेने पुढील तीन दिवस भरती-ओहोटीचा इशारा दिला आहे. शनिवार, 16 जुलै रोजी दुपारी 1.20 वाजता समुद्रसपाटीपासून 4.67 मीटर उंचीवर सर्वाधिक भरती-ओहोटी येईल. नागरिकांना भरती-ओहोटीच्या काळात समुद्रकिनाऱ्यावर जाऊ नये आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा - मुंबईकरांनो सावधान! उद्या शहरात मुसळधार पाऊस बरसणार

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मोठा पाणीसाठा - 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी मोडक सागर आणि तानसा ही दोन धरणे भरून वाहू लागली आहेत. या धरणात एकूण साठा 87% क्षमतेच्या वर आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, मध्य वैतरणेचे दोन दरवाजे उघडण्यात आले होते. तसेच अप्पर वैतरणा धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 
 


सम्बन्धित सामग्री