Thursday, August 21, 2025 12:36:07 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ऐतिहासिक निर्णय! 5 ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी 5 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती

या निर्णयानुसार प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या प्रकल्पासाठी एक स्वतंत्र आणि वरिष्ठ IAS अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. यापूर्वी राज्याच्या इतिहासात अशा प्रकारची स्वतंत्र नियुक्ती झालेली नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ऐतिहासिक निर्णय 5 ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी 5 वरिष्ठ ias अधिकाऱ्यांची नियुक्ती
Edited Image

मुंबई: राज्यातील पाच प्रमुख ज्योतिर्लिंगांच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या प्रकल्पासाठी एक स्वतंत्र आणि वरिष्ठ IAS अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. ही नेमणूक विकास आराखडे तयार करणे, अंमलबजावणी करणे आणि वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी करण्यात आली आहे. यापूर्वी राज्याच्या इतिहासात अशा प्रकारची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय नियुक्ती झालेली नाही. 

राज्यातील अध्यात्मिक वारसा टिकवून ठेवत भक्तांना आधुनिक सुविधा देण्याच्या दृष्टीने एकात्मिक विकास होणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक ज्योतिर्लिंगासाठी एक जबाबदार वरिष्ठ अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्यातील पाच प्रमुख ज्योतिर्लिंग मंदिरांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या अंतर्गत प्रत्येक ज्योतिर्लिंग प्रकल्पासाठी एक स्वतंत्र अधिकारी जबाबदारी पार पाडणार आहे. 

हेही वाचा - कबुतरखाना प्रश्नावर संतुलित तोडगा काढण्याचा प्रयत्न करू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाचे वक्तव्य

दरम्यान, श्री. भीमाशंकर येथे विकासासाठी श्रीमती वी. राधा, अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग यांची नियुक्ती झाली आहे. श्री. औंढा नागनाथ येथील प्रकल्पासाठी श्रीमती रिचा बगला, प्रधान सचिव, वित्त विभाग यांना जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच श्री. घृष्णेश्वर प्रकल्पासाठी श्री. बी. वेणुगोपाल रेड्डी, अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

हेही वाचा - तब्बल 14 हजार पुरुषांनी घेतला 'लाडकी बहीण' योजनेचा लाभ! सरकार गुन्हा दाखल करून पै न् पै वसूल करणार..

याशिवाय श्री. त्र्यंबकेश्वर मंदिर विकासासाठी श्री. सौरभ विजय, प्रधान सचिव, वित्त विभाग यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच श्री. अक्कलकोट वैजनाथ या प्रकल्पासाठी श्री. ए. व्ही. धुळे, सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांची नेमणूक करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असून, पायाभूत सुविधा, सांस्कृतिक वारशाचे संवर्धन आणि भाविकांसाठी सुविधा उभारणीचा वेग वाढणार आहे.
 


सम्बन्धित सामग्री