Friday, August 22, 2025 10:03:43 AM

Kunal Kamra Controversy: 'मी तेव्हाच माफी मागेन जेव्हा...'; एकनाथ शिंदे यांच्यावरील वादग्रस्त गाण्यानंतर कुणाल कामराने दिली प्रतिक्रिया, काय म्हणाला स्टँडअप कॉमेडियन?

कुणाल कामराने सांगितले आहे की, त्यांना त्याच्या 'देशद्रोही' वक्तव्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही. 'न्यायालयाने मला माफी मागण्यास सांगितलं, तरच मी माफी मागेल.' असं कामरा यांनी म्हटलं आहे.

kunal kamra controversy मी तेव्हाच माफी मागेन जेव्हा एकनाथ शिंदे यांच्यावरील वादग्रस्त गाण्यानंतर कुणाल कामराने दिली प्रतिक्रिया काय म्हणाला स्टँडअप कॉमेडियन
Kunal Kamra
Edited Image

Kunal Kamra Controversy: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा विनोदी कलाकार कुणाल कामरा सध्या चर्चेत आहे. एका कॉमेडी शोमध्ये कामरा यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली. दरम्यान, कुणाल कामराने मुंबई पोलिसांना सांगितले आहे की, त्यांना त्याच्या 'देशद्रोही' वक्तव्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही. 'न्यायालयाने मला माफी मागण्यास सांगितलं, तरच मी माफी मागेल,' असं कुणाल कामरा यांनी म्हटलं आहे. 

मी फरार नाही - कुणाल कामरा

पोलीस सूत्रांनी पुढे सांगितले की, कामरा यांनी तामिळनाडूतील पोलिसांशी बोलताना शिंदे यांना लक्ष्य करण्यासाठी विरोधकांनी पैसे दिल्याच्या अफवांचे खंडन केले. कुणाला कामरा यांनी पोलिसांना सांगितले की, ते त्याचे खाते तपासून पाहू शकतात. तथापि, कुणाल कामराने आपण फरार असल्याच्या अफवांचे खंडन केले आहे. कामरा यांनी म्हटलं आहे की, 'नेत्यांमध्ये आणि त्यांच्या शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये ज्या काही वेदना आहेत. ते न्यायालयासमोर सादर करा. जर न्यायालयाने मला माफी मागण्यास सांगितले तर मी नक्की माफी मागेल.' 

हेही वाचा - Kunal Kamra Show Controversy: कोण आहे कुणाल कामरा? आत्तापर्यंत कोणते कॉमेडियन वादात?

शो करण्यासाठी कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत - 

याशिवाय, कुणाल कामरा यांनी पुढे म्हटलं आहे की, 'मुंबई पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला असून चर्चा पूर्ण झाली आहे. पोलिसांकडून जे काही सूचना दिल्या जातील, आम्ही त्यांचे पालन करू. तथापि, कुणाल कामरा यांच्या मते, त्यांनी शो करण्यासाठी कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत. त्याने जी कविता केली होती, तो सर्व त्याचा स्वतःचा आशय होता. त्यांनी काळजीपूर्वक विचार करून आपले विधान दिले आहे. जर मी घटनात्मकदृष्ट्या चुकीचे सिद्ध झालो, तर नक्कीच माफी मागेल, असं कामरा यांनी नमूद केलं आहे. 

हेही वाचा - Kunal Kamra Controversy: शिवसेना नेते राहुल कनाल यांना अटक; कुणाल कामरा यांच्या स्टुडिओची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

शिवसेना कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल - 

मुंबई पोलिसांनी सोमवारी 'स्टँड-अप कॉमेडियन' कुणाल कामरा यांच्याविरुद्ध महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध कथितपणे अपमानजनक टिप्पणी केल्याबद्दल एफआयआर दाखल केला. मुंबईतील खार परिसरात असलेल्या 'हॅबिटॅट स्टुडिओ'ची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी सुमारे 19 शिवसेना कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
 


सम्बन्धित सामग्री