Sunday, August 31, 2025 05:23:02 PM

नोकरीचं आमिष दाखवून महिलेवर रिक्षामध्ये अत्याचार

सोलापूर जिल्ह्यात नोकरीचं आमिष दाखवून महिलेवर रिक्षामध्ये अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली.

नोकरीचं आमिष दाखवून महिलेवर रिक्षामध्ये अत्याचार

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात नोकरीचं आमिष दाखवून महिलेवर रिक्षामध्ये अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघांविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सोलापूरातील एमआयडीसीतील कारखान्यात काम लावण्याच्या बहाण्याने महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला. अविवाहित महिलेवर रिक्षामध्ये अत्याचार केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अविनाश क्षीरसागर, विशाल क्षीरसागर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा : नारायण राणेंच्या दाव्यावर संजय राऊतांचं स्पष्टीकरण

नेमकं सोलापूरात काय झालं? 
सोलापूरात एमआयडीसी येथील कारखान्यात काम लावण्याच्या बहाण्याने घेऊन जात अविवाहित महिलेवर रिक्षामध्ये अत्याचार करण्यात आला.  याप्रकरणी दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अविनाश क्षीरसागर, विशाल क्षीरसागर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2024 मध्ये पीडित महिला वडवळ येथील महादेव मंदिराला जाण्यासाठी सोलापूरच्या बस स्थानकावरून रिक्षात बसली. रिक्षाचालक विशाल क्षीरसागर याच्या सोबत पीडितेची ओळख झाली. दोघे फोनवर बोलू लागले काही दिवसांनी पीडितेने विशाल याला काम पाहिजे, असे सांगितले. विशालने पीडितेचे त्याचा भाऊ अविनाश क्षीरसागर याच्याशी बोलणे करून दिले. अविनाशने अक्कलकोट रोड येथील कारखान्यामध्ये ओळखीचे लोक असल्याचे सांगितले. 10 फेब्रुवारी 2025 रोजी विशालने पीडितेला काम पाहण्यासाठी जायचे आहे असे सांगितले. दरम्यान सायंकाळी साडे सहाच्या सुमारास अविनाश क्षीरसागर पीडितेला अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील मोकळ्या मैदानात रिक्षातून घेऊन गेला. त्यानंतर रिक्षातच तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकी पीडितेला दिली. 

                 

सम्बन्धित सामग्री