छत्रपती संभाजीनगर : लिव्ह इनमधील मुलीवर प्रियकराच्या तीन भावांनी चार वर्षे सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या नात्यातून महिलेला 13 वर्षे वयाचा मुलगा आणि 6 वर्षांची मुलगी आहे. तसेच सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर देखील अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पीडित महिलेने दिली आहे.
संभाजीनगरमधील माणुसकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. दोन मुलांना जन्म दिल्यानंतरही प्रियकराने आपल्या प्रेयसीला भावांच्या स्वाधीन केले. कुटुंबाला विरोध करून आल्याने पीडित महिला माहेरी देखील हा प्रकार सांगू शकली नाही.
हेही वाचा : नांदेडमध्ये मजूरांना घेऊन जाणार ट्रॅक्टर विहिरीत कोसळला; मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून अर्थसहाय्य मिळणार
वाळूज महानगरात पतीपासून वेगळी
प्रियकरासोबत राहणाऱ्या 34 वर्षीय विवाहितेवर चौघांनी चार वर्षे लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली असून नराधमांनी सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर देखील अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. फियार्दी महिलेचं आई-वडिलांनी 2010 मध्ये एका तरुणासोबत लग्न लावून दिलं. त्यानंतर महिला नवऱ्यासोबत दोन ते तीन वर्षे वाळूज महानगर परिसरात राहिली. तिला नवऱ्यासोबत राहायचे नसल्याने ती प्रियकरासोबत 2012 मध्ये पळून गेली.
प्रियकरासोबत बजाजनगर येथे 5 ते 6 वर्षे विवाह न करता (लिव्ह इन प्रमाणेच) राहिली. तेव्हा प्रियकराच्या घरी त्याची आई, मोठा भाऊ, त्याची पत्नी, दुसरा भाऊ, त्याची पत्नी असे सर्व एकत्र राहायचे. प्रियकरापासून तिला 13 वर्षांचा मुलगा व 6 वर्षाची मुलगी आहे. मात्र यानंतर प्रियकराच्या तिनं भावंडांनी तिच्यावर 4 वर्षे सामूहिक बलात्कार केला आहे. त्यासंदर्भात चौघांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.