Wednesday, August 20, 2025 09:14:57 AM

पुढील 48 तासात राज्यातील 'या' जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस

मागील काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याने हवामान विभागाने सोमवारी राज्यातील सर्व भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

पुढील 48 तासात राज्यातील या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस

मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याने हवामान विभागाने सोमवारी राज्यातील सर्व भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच, बीड, लातूर, धाराशिव या तीन जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईतील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यासह, विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा: TODAY'S HOROSCOPE: 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जाणून घ्या

ऑरेंज अलर्ट: पुणे, आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या सर्व जिल्ह्यांना पावसाचा ऑरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

यलो अलर्ट: कोल्हापूर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, ठाणे, धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, सिंधुदुर्ग, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
 


सम्बन्धित सामग्री