भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय झालाय.आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील हाय व्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये झाला. पाकिस्तानने पहिली पसंती फलंदाजीला दिली. त्यानंतर पाकिस्तानचा संघ 241 वर ऑल आऊट झाला. त्यामुळे टीम इंडियासमोर 242 धावांचे आव्हान होते. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने 3 विकेट, त्याचबरोबर रविंद्र जडेजाने 2 तर अक्षर पटेल आणि हर्षित राणाने प्रत्येकी 1 विकेट घेतली. पाकिस्तानकडून बाबर आझम आणि इमाम उल हक सलामीसा फलंदाजीसाठी उतरले होते. या दोन्ही खेळाडूंनी सुरूवातीचे ओव्हर्स खुप चांगली फलंदाजी केली.त्यामुळे टीम इंडियाला विकेटसाठी संघर्ष करावा लागला. परंतु हा संघर्ष मात्र खरा ठरला. भारताने पाकिस्तान संघावर मात केलीय. यामुळे सर्वत्र जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळतंय.
असा होता भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शामी
असा होता पाकिस्तान संघ:
बाबर आझम, सउद शकील, मोहम्मद रिझवान, इमाम उल हक, सलमान अली आगा, तैयब ताहिर, खुशदिल शाह, अबरार अहमद, हारिस रऊफ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी.