Wednesday, August 20, 2025 09:29:55 AM

इंद्रजित सावंत धमकीप्रकरणी अर्ज फेटाळला; कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निर्णय

प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाकण्यात आलाय. इंद्रजित सावंत धमकीप्रकरणी हा अर्ज फेटाळण्यात आलाय. कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा हा निर्णय असून आता प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय.

इंद्रजित सावंत धमकीप्रकरणी अर्ज फेटाळला कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निर्णय

कोल्हापूर: प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाकण्यात आलाय. इंद्रजित सावंत धमकीप्रकरणी हा अर्ज फेटाळण्यात आलाय. कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा   हा निर्णय असून आता प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. कालच प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातील अंडा सेलमध्ये रवानगी कारतण्यात आली होती. त्यांनतर आता प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. 

हेही वाचा: Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana: काय आहे श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना? कोणाला मिळणार लाभ

कोरटकरला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातील अंडा सेलमध्ये रवानगी करण्यात आली होती. अंडा सेलमध्ये प्रशांत कोरटकरवर दहा सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजरहोती . शिवाय दोन कारागृह कर्मचारी देखील प्रशांत कोरटकरवर सतत लक्ष ठेवून असल्याचं बोललं जातंय. काही दिवसांपूर्वी सुनावणी वेळी प्रशांत कोरटकरवर दोन वेळा हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी कारागृहात सुरक्षित कोठडी देण्याची न्यायालयाला  विनंती केली होती. यानंतर वकिलांनी केलेल्या विनंतीनंतर कोरटकरला अंडासेलमध्ये स्वतंत्र कोठडीत ठेवण्यात आले होते. 

एरवी सराईत आणि बॉम्बस्फोट अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींनाच अंडा सेलमध्ये ठेवलं जातं मात्र आता प्रशांत कोरटकर याला देखील अंडा सेलमध्ये ठेवण्यात आल्याने याची सर्वत्र चर्चा होती . त्यानंतर आता प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला असून इंद्रजित सावंत धमकीप्रकरणी हा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने हा निर्णय दिलाय. 


सम्बन्धित सामग्री