Thursday, August 21, 2025 05:40:40 AM

Ladki Bahin Scheme: लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीची रक्कम जमा होणार; मंत्री तटकरेंनी दिली माहिती

लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

ladki bahin scheme लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीची रक्कम जमा होणार मंत्री तटकरेंनी दिली माहिती

मुंबई : राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत देण्यात येणार असल्याची अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गुरूवारी मंत्रालयात मंत्रीपरिषद बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

मंत्री तटकरे म्हणाल्या की, राज्य  शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून लाभ वितरीत करण्यास सुरुवात केली. त्यानुसार योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत थेट लाभ हस्तंतरणाद्वरे (डी बी टी द्वारे) पात्र महिला लाभार्थ्यांना  हस्तांतरित करण्यात येणार आहे. यासाठी 3 हजार 690 कोटी इतक्या रकमेला मंजुरी देण्यात आली आहे.

हेही वाचा : 132 शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण; सरकारचा निर्णय

 

लाडक्या बहिणींना आता जानेवारीचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून महिलांना अर्थसहाय्य करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. सरकारने जुलै महिन्यात ही योजना सुरू केली. यामुळे लाडकी बहिणींना आर्थिक मदत झाली. डिसेंबरपर्यंतचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाला होता. लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्यातील हप्त्याची प्रतिक्षा होती. मात्र आता ती संपली. 26 जानेवारीपर्यंत महिलांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. याआधी मकरसंक्रांतीला पैसे महिलांच्या खात्यात जमा होतील असा अंदाज होता. मात्र मकर संक्रांतीला लाडक्या बहिणींनीच्या खात्यात रक्कमा जमा नाही झाली. परंतु आता मंत्री अदिती तटकरे यांनी 26 जानेवारीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे. 

 

 

 


सम्बन्धित सामग्री