Thursday, September 04, 2025 01:59:13 PM

अजित पवारांच्या घरी येणार धाकटी सून..

महाराष्ट्रात नेहमीच काहीना काही राजकीय घडामोडी घडत असतात. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरामध्ये आनंदाचे वाटेवर पाहायला मिळतंय.

अजित पवारांच्या घरी येणार धाकटी सून

महाराष्ट्र: महाराष्ट्रात नेहमीच काहीना काही राजकीय घडामोडी घडत असतात. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरामध्ये आनंदाचे वाटेवर पाहायला मिळतंय. याच कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धाकटा मुलगा  जय पवार लग्न बंधनात अडकणार आहे. शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणजेच जय पवार यांच्या आत्या यांनी यांनी फोटो शेयर केले आहेत. 

हेही वाचा : यशोमती ठाकूर यांचं बंजारा समाजासोबत धुलिवंदन

 सोशल मीडियावर सुप्रिया सुळेंची माहिती:  
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटूंबात सुनबाईचे आगमन होणार असून जय पवार विवाहबंधनात अडकणार असल्याची गुड न्यूज खासदार सुप्रिया सुळेंनी दिली. ऋतुजा पाटील पवार घराण्याची सुनबाई होणार असल्याची बातमी खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना पार्थ पवार आणि जय पवार अशी दोन मुलं आहेत.

कोण आहे ऋतुजा पाटील? 
जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नी पवार कुटुबांच्या भावी सूनबाई ऋतुजा पाटील या सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे साताऱ्यातील फलटणचे प्रविण पाटील यांच्या कन्या आहेत. ऋतुजा पाटील या उच्चशिक्षित आहेत. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांची गेल्या काही वर्षांपासून ओळख आहे. 

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धाकटा मुलगा  जय पवार लग्न बंधनात अडकणार आहे. शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणजेच जय पवार यांच्या आत्या यांनी यांनी फोटो शेयर केले आहेत. यामुळे पवार घराण्यात सद्या आनंदाचे  वातावरण पाहायला मिळतंय. 


 


सम्बन्धित सामग्री