Wednesday, August 20, 2025 09:28:13 AM

आर्ची होणार महाडिकांची सून?

कोल्हापुरातील प्रसिद्ध आणि आवडीचं कुटुंब म्हणजे महाडिक कुटुंब. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक हे लोकांच्या नेहमीच पसंतीस पडतात. महाडिक यांना तीन मुलं आहेत.

आर्ची होणार महाडिकांची सून

महाराष्ट्र: कोल्हापुरातील प्रसिद्ध आणि आवडीचं कुटुंब म्हणजे महाडिक कुटुंब. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक हे लोकांच्या नेहमीच पसंतीस पडतात. महाडिक यांना तीन मुलं आहेत. त्यातील दोघांची लग्न झालीत. त्यांचा तिसरा मुलगा कृष्णराज महाडिक याचं लग्न अजून बाकी आहे. काही दिवसांपूर्वीच  राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी कृष्णराजच्या लग्नाविषयी बातचीत केली होती. आणि त्यातच आता राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचा तिसरा मुलगा कृष्णराज महाडिक आणि मराठी चित्रपट विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू अर्थात आर्ची यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.  कोल्हापुरातील श्री महालक्ष्मीच्या मंदिराबाहेरील हा फोटो आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात महाडिकांच्या घरात बार उडणार असं दिसतंय. याचं कारणही तितकंच खास असल्याचं दिसतंय. धनंजय महाडिक यांचा तिसरा मुलगा कृष्णराज महाडिक याचं लग्न होणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

हेही वाचा: रुपाली चाकणकरांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या दोघांना अटक

कोण आहे कृष्णराज महाडिक? 

कृष्णराज महाडिक हा धनंजय महाडिक यांचा मुलगा आहे. कृष्णराजचा जन्म 12 जून 1998 रोजी झाला. ब्रिटिश फॉर्म्युला 3 चॅम्पियनशिप जिंकणारा कृष्णराज हा दुसरा भारतीय आहे. वयाच्या 14 व्या वर्षी कृष्णाने राष्ट्रीय गो-कार्टिंग अजिंक्यपद जिंकलं आहे. त्याला राजकारणात यायचं आहे. तो समाजकारणात सक्रिय आहे. सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याचं युट्यूब चॅनेल असून तिथे त्याचे 632k सब्सक्राइबर्स आहेत.

दरम्यान आता या सोशल मीडियावरील चर्चेवर कृष्णराजने प्रतिक्रिया दिलीय.  आमच्यात तसं काही नाही, तसं काही समज करून घेऊ नका,असं कृष्णराज महाडिक याने स्पष्ट केले आहे. 
 


सम्बन्धित सामग्री