राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी एका व्यक्तीला तब्बल 80 मुलं असून याची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे म्हटले आहे. नागपूर येथे आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद पार पडली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनीही पत्रकारांशी संवाद साधताना या मुद्द्यावर सरकारला मिश्किल टोला लगावला.
हेही वाचा : Pune News : पुण्यात तीन महापालिका?; अजित पवारांकडून घोषणा, मात्र मुख्यमंत्र्यांनी मांडलं वेगळ मत, म्हणाले...
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, रामकमलदास या इसमाच्या कुटुंबात तब्बल 80 लोकं आहे. त्याला 80 मुलं असल्याची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. असे असल्यास त्याच्या पत्नीला एका वर्षात 3 मुलं झाली का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर टीकास्त्र सोडले आहे.