Monday, September 01, 2025 12:06:12 AM

कोल्हापूर युवा सेनेच्या वतीने 59 किलोचा भव्य लाडू आई अंबाबाई चरणी अर्पण

कोल्हापूरात ठाकरे पक्षाच्या 59 व्या वर्धापनदिन आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम राबवण्यात आला.

कोल्हापूर युवा सेनेच्या वतीने 59 किलोचा भव्य लाडू आई अंबाबाई चरणी अर्पण

अमरसिंह पाटील. प्रतिनिधी. कोल्हापूर: ठाकरे पक्षाच्या 59 व्या वर्धापनदिन आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात आले. कोल्हापूरात ठाकरे पक्षाच्या 59 व्या वर्धापनदिन आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम राबवण्यात आला.

हेही वाचा: 'मीच चेअरमन होणार, सगळं नियमाने करणार'; उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विश्वास

कोल्हापुरातील युवा सेनेने चक्क 59 किलोचा मोतीचूर लाडू आई अंबाबाईंच्या मंदिरात अर्पण केला आहे. मंदिर परिसरात या भल्या मोठ्या लाडूला पाहण्यासाठी भाविकांची गर्दी झाली. तसेच भाविकांना हा लाडू पाहता यावा म्हणून तो मंदिर परिसरातील विद्यापीठ हायस्कूल गेटजवळ ठेवण्यात आला होता. 59 व्या वर्धापनदिनानिमित्त 59 किलोचा लाडू हा एक अनोखा उपक्रम युवा सेनेच्या वतीने धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मंगळवारी पाहायला मिळाला.


सम्बन्धित सामग्री