मुंबई: गेल्या वर्षी सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजना खूप चर्चेत आहे. कारण लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यावर अनेक लाडक्या बहिणींनी सरकारची फसवणूक केली असे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.
राज्य शासनाने पहिल्याच आदेशामध्ये स्पष्ट नमूद केले होते की, ज्या महिला आधीपासून इतर शासकीय योजना किंवा इतर लाभ घेत आहेत, त्यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेत अर्ज करू नये. तरीदेखील काही महिलांनी सरकारी योजनांचा लाभ घेत असतानाही लाडक्या बहीण योजनेसाठी अर्ज सादर केला. या प्रकारामुळे सरकारची फसवणूक झाल्याचा थेट आरोप पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.
हेही वाचा: वराह जयंतीला नितेश राणेंनी वराह अवतारात वावरावं, सुषमा अंधारेंचा खोचक टोला
दरम्यान, पात्र लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये लवकरच योग्य वेळी मिळतील असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचेही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.
गेल्या जुलै महिन्यापासून लाडकी बहीण योजना सुरु झाली आहे. निवडणुकीआधी पार्श्वभूमीवर सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेतून राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजना गेंमचेंजर ठरली आहे. मात्र या योजनेत अनेक लाडक्या बहिणींनी सरकारची फसवणुक केली असल्याचा आरोप मंत्री शंभूराजे देसाई यांनी केला. लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या लाडक्या बहिणींवर कारवाई करणार असल्याचेही सरकारने सांगितले आहे.