Monday, September 01, 2025 10:44:39 AM

Ram Navami 2025: रामनवमीच्या साक्षीने शिर्डी दुमदुमली; दर्शनासाठी लाखो भक्तांची उपस्थिती

शिर्डीतील साईबाबा मंदिरात रामनवमीचा उत्सव भक्तीमय वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. तीन दिवसीय या उत्सवाचा आज दुसरा आणि मुख्य दिवस असून, दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

ram navami 2025 रामनवमीच्या साक्षीने शिर्डी दुमदुमली दर्शनासाठी लाखो भक्तांची उपस्थिती

शिर्डी: शिर्डीतील साईबाबा मंदिरात रामनवमीचा उत्सव भक्तीमय वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. तीन दिवसीय या उत्सवाचा आज दुसरा आणि मुख्य दिवस असून, दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

साईमंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने सजले असून, भक्तांच्या स्वागतासाठी उभारलेली कमान विशेष आकर्षण ठरत आहे. पहाटे साईबाबांच्या काकड आरतीनंतर त्यांच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात आली, ज्यात हजारो भक्तांनी सहभाग घेतला. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून, दुपारी रामजन्मोत्सव साजरा होणार आहे.

हेही वाचा: नागपुरात रामनवमीची भव्य शोभायात्रा; मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरींची उपस्थिती

राज्यभरातून शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या असून, आज लाखो साईभक्त दर्शनासाठी येण्याची अपेक्षा आहे. भक्तांच्या वाढत्या संख्येमुळे, मंदिर प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. दोन हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आले असून, ड्रोन कॅमेरांच्या माध्यमातून देखील शोभायात्रेवर करडी नजर ठेवली जात आहे.

शिर्डीतील हा रामनवमी उत्सव भक्ती, सौहार्द आणि सुरक्षिततेचे उत्कृष्ट उदाहरण ठरत आहे. विविध धर्मीय भक्तांच्या सहभागाने, साईबाबांच्या शिकवणीप्रमाणे प्रेम आणि एकतेचा संदेश या उत्सवातून पसरत आहे.

 

'>http://

 


सम्बन्धित सामग्री






Live TV