Leopard Enters TV Show Set In Mumbai's Film City
Twitter/@AICWAofficial
Leopard Enters TV Show Set In Mumbai's Film City: मुंबईतील फिल्म सिटीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यांच्या सततच्या घटनांमुळे पुन्हा एकदा चित्रपट कामगार, तंत्रज्ञ, कनिष्ठ कलाकार आणि अभिनेत्यांचे जीवन धोक्यात आले आहे. 5 मार्च 2025 रोजी रात्री 8 वाजता 'पॉकेट में आसमान' या टीव्ही मालिकेच्या सेटवर एक बिबट्या फिरताना दिसला. सुदैवाने, या घटनेत कोणतीही दुर्घटनेची नोंद झाली नाही. परंतु, या घटनेमुळे चित्रपटाच्या सेटवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. फिल्म सिटीमध्ये बिबट्या वावर ही पहिलीचं घटना नाही. यापूर्वी अनेक वेळा अशा घटना घडल्या आहेत. एवढचं नाही तर अगदी दिवसाढवळ्या बिबटे शूटिंग सेटमध्ये घुसतात आणि लोकांवर हल्ला करतात. ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने महाराष्ट्र सरकारला एक खुले पत्र लिहून सुरक्षेतील त्रुटींविरुद्ध पावले उचलण्याची मागणी केली आहे. याशिवाय, AICWA ने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून बिबट्याचा सेट वरील व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
हेही वाचा - बिबट्यापुढे ताकद दाखवण्याचा प्रयत्न महागात! 5 सेकंदात हातच तोडला – थरारक व्हिडीओ व्हायरल
फिल्म सिटीमध्ये दररोज सुमारे 100 ते 200 शूटिंग सेट असतात, जिथे हजारो कामगार, तंत्रज्ञ, कनिष्ठ कलाकार आणि अभिनेते आपला उदरनिर्वाह करतात. भारताच्या मनोरंजन उद्योगात आणि अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या या लोकांना सरकारच्या दुर्लक्षामुळे दररोज आपला जीव धोक्यात घालण्यास भाग पाडले जात आहे. आतापर्यंत फिल्म सिटीमध्ये बिबट्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या. परंतु, अद्याप महाराष्ट्र सरकारने या कामगारांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी कोणतीही ठोस योजना आखलेली नाही.
हेही वाचा - बोर व्याघ्र प्रकल्पात वाघ सुरक्षित, पण बिबट्यांची घटती संख्या चिंताजनक
जर सरकार जंगलाने वेढलेल्या फिल्म सिटीमध्ये पुरेशी सुरक्षा देऊ शकत नसेल, तर त्यांनी मुंबईत किंवा त्याच्या बाहेर एक नवीन, सुरक्षित फिल्म सिटी बांधावी. अर्थव्यवस्थेत योगदान देणाऱ्या आणि इतर नागरिकांप्रमाणे कर भरणाऱ्या या कामगारांच्या जीवनाचे रक्षण करण्याची सरकारची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. भारतीय चित्रपट उद्योग दरवर्षी 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवतो, तरीही या प्रचंड उद्योगामागील लोकांना वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांपासून स्वतःचे संरक्षण करावे लागते, असं AICWA ने म्हटलं आहे.
मुंबई फिल्म सिटीमध्ये बिबट्याची दहशत, पहा व्हिडिओ -
AICWA ने केली महाराष्ट्र सरकारकडून तात्काळ हस्तक्षेपाची मागणी -
AICWA ने पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि माननीय कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना पत्र लिहून फिल्म सिटीमध्ये बिबट्यांचा धोका रोखण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. तसेच AICWA ने सरकारला काही उपाययोजना देखील सांगितल्या आहे. यामध्ये सुरक्षित ठिकाणी नवीन फिल्म सीटी बांधण्याचं आवाहनही AICWA कडून करण्यात आलं आहे.