Monday, September 01, 2025 09:17:55 AM

Lalbaughcha Raja 2025 : लालबागचा राजा मंडळाला बीएमसीची नोटीस ; 24 तासांचा अवधी अन्यथा...

आता एक माहिती समोर आली आहे. लालबागचा राजा मंडळाला मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे.

lalbaughcha raja 2025  लालबागचा राजा मंडळाला बीएमसीची नोटीस  24 तासांचा अवधी अन्यथा
lalbaughcha raja

सध्या सर्वत्र लाडक्या गणरायांचं आगमन झाले आहे. मुंबईमधील प्रसिद्ध असलेल्या  लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दीदेखील होत असते. अशातच आता एक माहिती समोर आली आहे. लालबाग मंडळाला मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे. 

 यावर्षी गणेशभक्तांसाठी प्रसाद म्हणून जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला आणि अन्नछत्र उभारले आहे. मात्र मुंबई पोलिसांसह, अग्निशमन दलाने दिलेल्या नकारानंतरही उभारणी केल्याने त्याआधारे मुंबई महापालिकेच्या एफ दक्षिण वॉर्डकडून जागेच्या मूळ मालकांनाच मंगळवारी नोटीस बजावली. या नोटीसमध्ये 24  तासांत अन्नछत्र काढा, अन्यथा कारवाई करून काढण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. 

हेही वाचा - Ganesh Chaturthi 2025: नैवेद्याशिवाय अपूर्ण आहे बाप्पाची पूजा, जाणून घ्या खास 10 पदार्थ 

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांसाठी प्रसाद म्हणून जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय मंडळाने घेतला. मात्र या अन्नछत्रात होणारी गर्दी आणि त्यामुळे चेंगराचेंगरीचा धोका आणि अन्य कायदा-सुव्यवस्था पाहता सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याला मुंबई पोलिसांसह अग्निशमन दलानेही परवानगी देण्यास नकार दिला. 

हेही वाचा - Ganesh Chaturthi 2025: गणेश पूजन करताना विसरू नका ‘हे’ खास नियम; जाणून घ्या शास्त्र काय सांगते 

मुंबई पोलिस आणि अग्निशमन दलाने परवानगी नाकारल्यानंतरच ही नोटीस वॉर्डकडून बजावण्यात आल्याचे सांगितले. एकावेळी 500 पेक्षा जास्त जण या अन्नछत्रात प्रसाद घेऊ शकतील, अशी व्यवस्था केली जात होती. मात्र सुरक्षिततेच्या कारणास्तव ती नाकारण्यात आली.

 


सम्बन्धित सामग्री