Wednesday, August 20, 2025 04:34:44 AM

School Student Stuck in Bus : बसमध्ये अडकलेल्या लहानग्यांना गुढघाभर पाण्यातून काढले बाहेर, पोलिसांच्या कृतीचे कौतुक, Video Viral

शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अशातच आता एक व्हिडीओ समोर आला आहे.

school student stuck in bus  बसमध्ये अडकलेल्या लहानग्यांना गुढघाभर पाण्यातून काढले बाहेर पोलिसांच्या कृतीचे कौतुक video viral
mumbai rain

मुंबईला हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. मुंबईमधील अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याचा दाट शक्यता आहे. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अशातच आता एक व्हिडीओ समोर आला आहे. 

माटुंगामधील पोलिस ठाण्याजवळ डॉन बॉस्को स्कूलची बस पाण्यात अडकली होती. या बसमध्ये मुलं आणि महिला जवळपास एक तास अडकले होते. या घटनेची माहिती नागरिकांनी डीसीपी झोन 4 ला  दिली.  त्यानंतर लगेचच माटुंगाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र पवार आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि दोन मिनिटांत सर्वांना वाचवले आणि त्यांना सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी मुलांची भिती काढण्यासाठी त्यांना बिस्किटे देखील दिली.

हेही वाचा - Devendra Fadanvis on Rain Update : मुंबईला रेड अलर्ट ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाबद्दल दिली महत्त्वाची अपडेट 

पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव : 

या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये  पोलिस हे मुलांना सांभाळून पाण्यातून कडेवर घेऊन सुरक्षित ठिकाणी घेऊन जात आहेत.फोटो आणि व्हिडीओ पुढे आल्यानंतर पोलिसांवर कौतुकाचा जोरदार वर्षाव झाला. 

हेही वाचा - Rain Update : मुंबईमध्ये पावसाचे थैमान ! जाणून घ्या कुठे किती पाऊस झाला ? 

मुंबई-पुण्याला सतर्कतेचा इशारा  : 
आज आणि उद्या कोकण, गोवा आणि मध्यमहाराष्ट्रातील घाट परिसराला रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईला आज आणि उद्या हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. पुण्याला आज आणि उद्या येलो अलर्ट देण्यात आलाय. 

पाहा व्हिडीओ 


सम्बन्धित सामग्री