Thursday, August 21, 2025 12:07:23 AM

त्र्यंबकेश्वरात महाशिवरात्री उत्साहात! नागा साधूंनी केले कुशावर्त तीर्थात स्नान

महाशिवरात्रीच्या पावन दिवशी पवित्र कुशावर्त तीर्थात नागा साधू आणि हजारो शिवभक्तांनी पवित्र स्नान करून भगवान महादेवाची आराधना केली.

त्र्यंबकेश्वरात महाशिवरात्री उत्साहात  नागा साधूंनी केले कुशावर्त तीर्थात स्नान


त्र्यंबकेश्वर: महाशिवरात्रीच्या पावन दिवशी पवित्र कुशावर्त तीर्थात नागा साधू आणि हजारो शिवभक्तांनी पवित्र स्नान करून भगवान महादेवाची आराधना केली. महाशिवरात्रीच्या दिवशी या स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने देशभरातून आलेले भाविक आणि साधू महंतांनी मोठ्या श्रद्धेने स्नान व पूजा-अर्चा केली.

त्र्यंबकेश्वरातील कुशावर्त तीर्थ हे कुंभमेळ्याच्या शाही स्नानासाठी प्रसिद्ध असून, आजच्या स्नानावेळी कुंभमेळ्याची झलक अनुभवायला मिळाली. ‘हर हर महादेव’ आणि ‘बोल बम’च्या गजरात नागा साधूंचा अनुशासित आणि भव्य स्नान सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

हेही वाचा : घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची फ्री-स्टाईल हाणामारी!
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरातही पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली. मंदिरात विशेष महाआरती, रुद्राभिषेक आणि विविध धार्मिक विधींनी शिवभक्त महाशिवरात्री साजरी करत आहेत.

महादेवाच्या कृपेसाठी त्र्यंबकेश्वर नगरीत ओसंडून वाहणाऱ्या भक्तीमय वातावरणात आज महाशिवरात्रीचा सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जात आहे! 

हेही वाचा : महाशिवरात्री उत्साहात! घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांचा महापूर


सम्बन्धित सामग्री