Nanded Tractor Accident प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image
Nanded Tractor Accident: नांदेड जिल्ह्यातून अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. शेतमजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेड पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा अपघात सकाळी 7.30 च्या सुमारास आलेगाव गावात घडला. ट्रॅक्टरवर किमान 10 जण बसून हळदीचे पीक कापण्यासाठी शेतात जात असताना हा अपघात घडला. पावसामुळे परिसर निसरडा झाला होता.
हेही वाचा - इन्स्टाग्रामवर लाईक्स मिळवणं पडलं महागात, सागर कारंडेची 61 लाखांची फसवणूक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
प्राप्त माहितीनुसार, महिला कामगार हळद कापणीसाठी ट्रॅक्टरवरून शेतात जात होत्या. रस्त्यात एक विहीर आहे हे चालकाला माहीत नव्हते आणि परिणामी ट्रॅक्टर थेट विहिरीत पडला. ट्रॅक्टर विहिरीत पडताच आरडाओरडा झाला. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दोन ते तीन जण वेळेत ट्रॅक्टरवरून उडी मारण्यात यशस्वी झाले. मात्र, इतर कामगार पाण्यात बुडाले. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - अवकाळी पावसाने बळीराजाला पुन्हा रडवलं; नाशिक, धुळ्यासह संभाजीनगरमध्ये पावसाची हजेरी
स्थानिक नागरिकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरु केलं. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. विहीरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने ट्रॅक्ट्रर पाण्यात पूर्णपण बुडला. विहिरीत फक्त ट्रॅक्ट्ररचे एक चाक दिसत आहे. या अपघातानंतर गावात शोककळा पसरली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला कामगारांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.