मुंबई: बारामतीत आज ओबीसीचा मोर्चा निघाला आहे, तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगेंची प्रतिक्रिया समोर आली आहे. मनोज जरांगेंनी मंत्री छगन भुजबळांना आव्हान दिले. यादरम्यान, मनोज जरांगेंनी आव्हानात्मक भाषा वापरली आहे. 'खुशाल जा कोर्टात, काही फरक पडत नाही', मनोज जरांगेंनी भुजबळांविरोधात आव्हानात्मक भाषा वापरली आहे. महायुतीच्या आदेशाला ओबीसी नेते आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.
'हैदराबाद गॅझेटच्या जीआरला कोर्टात आव्हान देणार', 'आम्ही कोर्टात जाणार आणि सोक्षमोक्ष लावणार', अशी घोषणा मंत्री छगन भुजबळांनी केली आहे. यावर, मनोज जरांगे म्हणाले, 'खुशाल जा कोर्टात, काही फरक पडत नाही'.