Monday, September 01, 2025 01:15:19 AM

अरे देवा!!! CIBIL स्कोअर कमी भरल्याने मोडलं लग्न! अकोल्यातील घटना

CIBIL स्कोअरमुळे लग्न मोडू शकतं. यावर तुमचा विश्वास बसू शकतो का? तुम्हाला यावर कदाचित विश्वास नाही बसणार. परंतु, महाराष्ट्रात CIBIL स्कोअरमुळे एका मुलाचं लग्न मोडल्याची घटना समोर आली आहे.

अरे देवा cibil स्कोअर कमी भरल्याने मोडलं लग्न अकोल्यातील घटना
Marriage Break
Edited Image

Low CIBIL Score: तुम्ही जेव्हा एखाद्या बँकेकडून कर्ज घेता, तेव्हा बँक तुमच्या CIBIL स्कोअर चेक करते. त्यानंतर जर तुमचा CIBIL स्कोअर चांगला असेल तर बँक तुम्हाला जास्तीत जास्त कर्ज देते. कमी CIBIL स्कोअरमुळे बँका तुम्हाला कर्ज देणं टाळतात. परंतु, CIBIL स्कोअरमुळे लग्न मोडू शकतं. यावर तुमचा विश्वास बसू शकतो का? तुम्हाला यावर कदाचित विश्वास नाही बसणार. परंतु, महाराष्ट्रात CIBIL स्कोअरमुळे एका मुलाचं लग्न मोडल्याची घटना समोर आली आहे. 

प्राप्त माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूरमध्ये, नवरा मुलगा आणि नवऱ्या मुलीच्या पसंतीनंतर CIBIL स्कोअरमुळे लग्न मोडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेवरून लोकांमधील आर्थिक साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित होतं आहे. मुलगा आणि मुलगी एकमेकांना पसंत पडल्यानंतर या दोघांच्या घरच्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु, मुलीच्या काकांनी मुलाचा CIBIL स्कोअर चेक करण्याचा आग्रह धरला.

हेही वाचा - मुलीच्या खात्यात येतील 70 लाख रुपये! 'या' सरकारी योजनेत गुंतवणूक केल्यास चमकेल तुमचं नशीब

CIBIL स्कोअरमुळे मोडलं लग्न -  

मुलीच्या काकांचा हा आग्रह नवऱ्या मुलाने पूर्ण केला. पण तो यात अडकला. कारण, नवऱ्या मुलाच्या CIBIL स्कोअरवरून अनेक धक्कादायक खुलासे झाले. या मुलावर मोठं कर्ज असल्याचं मुलीच्या कुटुंबियांना समजलं. आर्थिक परिस्थिती हालाखीची असताना नवऱ्या मुलीच्या कुटुंबियांनी या लग्नाला नकार दिला. CIBIL स्कोअरमुळे लग्न मोडल्याने सध्या सर्वत्र हे प्रकरण चर्चेचा विषय ठरलं आहे.

हेही वाचा -   आरबीआयने रेपो रेटमध्ये केली 25 बेसिस पॉइंट्सने कपात; कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होणार? जाणून घ्या

CIBIL स्कोअर - 

CIBIL स्कोअर हा तीन-अंकी क्रमांक असतो. CIBIL स्कोअरमुळे एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट इतिहास समजण्यास मदत होते. हा स्कोअर 300 ते 900 च्या दरम्यान असतो. CIBIL स्कोअर जास्त असणाऱ्या व्यक्तींना बँका मोठ्या प्रमाणात कर्ज देतात. परंतु, जर CIBIL स्कोअर कमी असेल तर बँका त्या व्यक्तीला कर्ज देताना विचार करतात.  


सम्बन्धित सामग्री