Mumbai Metro Update: मुंबईत 27 ऑगस्टपासून गणेशोत्सवाचा जल्लोष मोठ्या थाटामाटात सुरू होणार आहे. बाप्पाच्या आगमनासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले असून, लाखो भाविक गणपतीचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक आहेत. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
एमएमआरडीएने जाहीर केले आहे की, गणेशोत्सवाच्या कालावधीत मुंबई मेट्रो सेवा रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. हा निर्णय विशेषतः त्या भाविकांच्या सोयीसाठी घेण्यात आला आहे, जे रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी जातात आणि त्यानंतर सुरक्षितपणे घरी परतू इच्छितात. ही विशेष सेवा 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 दरम्यान उपलब्ध असेल. या कालावधीनंतर मेट्रो सेवा पुन्हा पूर्ववत होऊन रात्री 11 वाजेपर्यंतच मर्यादित राहील.
हेही वाचा - Bus Catches Fire On Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला आग; 44 प्रवासी थोडक्यात बचावले
गर्दी नियंत्रण आणि सुविधा
एमएमआरडीएच्या मते, या निर्णयामुळे उत्सव काळातील प्रचंड गर्दी नियंत्रित ठेवण्यास मदत होईल तसेच प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने अतिरिक्त वाहतूक व्यवस्थेची गरज भासते.
हेही वाचा - Mumbai Rain Update: आज मुंबईत हवामान कसे असेल? जाणून घ्या नवीन अपडेट
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले आहे की, गणपती उत्सव हा मुंबईकरांच्या भावनेशी जोडलेला सण आहे. मेट्रोच्या वेळा वाढवल्याने लाखो भाविक सहजपणे घरी पोहोचू शकतील. यामुळे त्यांच्या सुरक्षेची खात्रीही करता येईल. तथापी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, भाविकांना कोणत्याही अडचणीशिवाय उत्सवाचा आनंद घेता येईल. प्रशासनाचे हे पाऊल नागरिकांसाठी दिलासा देणारी बाब आहे. मुंबईतील नागरिक आणि गणेशभक्तांसाठी ही सुविधा दिल्याने यंदाचा गणेशोत्सव अधिक आनंददायी आणि सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.