Wednesday, August 20, 2025 09:30:20 AM

ठाण्यात मराठी मुद्द्यावरून मनसैनिक आक्रमक

सालाबादप्रमाणे यंदाही गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क येथे मनसेचा मेळावा संपन्न झाला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना संबोधित केले.

ठाण्यात मराठी मुद्द्यावरून मनसैनिक आक्रमक

ठाणे: सालाबादप्रमाणे यंदाही गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क येथे मनसेचा मेळावा संपन्न झाला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  मनसैनिकांना संबोधित केले. येवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर आपली भूमिका मांडली. यात मराठी भाषा, औरंगजेबाची कबर,  कुंभमेळा आणि नदी प्रदूषण त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. 

हेही वाचा:राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय; ई - बाईक टॅक्सीला मंजुरी

त्याचबरोबर मराठी भाषेसंदर्भात बोलतांना 'मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा' 'इथे मराठीतच बोलायचं' 'नाहीतर कानाखाली बसणारच' असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केले होते. त्यांनतर बँकेत मराठी बोलली जाते की नाही हे पाहण्याचं आवाहन राज ठाकरेंनी मनसैनिकांना केलं होत त्यानंतर आता मनसैनिक ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय. गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी आवाहन केल्यानंतर मनसैनिक थेट बँकेत जात मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. आम्हाला हलक्यात घेऊ नका नाहीतर आम्ही तुम्हाला हलकं करू असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिलाय. 

त्यानंतर आता पवईतून याच संदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय. पवईतील सुरक्षा रक्षकाची मुजोरी पाहायला मिळतेय. 'मराठी गया तेल लगाने' अशा भाषेत सुरक्षा रक्षकाने मराठी भाषेचा अवमान केल्याने  मनसैनिकांनी सुरक्षा रक्षकाला चोप दिल्याचं पाहायला मिळतंय. पवईतील 'एल अँड टी' (L&T) कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने "मराठी गया तेल लगाने!" असे म्हणत मायमराठीचा अपमान केला. या वक्तव्याने संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्याला चांगलाच धडा शिकवत कानाखाली मारत कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला माफी मागायला लावली. 


सम्बन्धित सामग्री