Mobile Blast in Mumbai Local Train
Edited Image
Mobile Blast in Mumbai Local Train: मुंबई लोकल ट्रेनसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. ठाणे येथे एका महिला प्रवाशाच्या मोबाईल फोनचा लोकल ट्रेनमध्ये स्फोट झाला. त्यामुळे काही काळ लोकलच्या डब्यात घबराट पसरली. ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)-कल्याण उपनगरीय ट्रेनमध्ये सोमवारी रात्री 8.12 वाजता कळवा स्थानकावर घडलेल्या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. सीएसएमटी रेल्वे नियंत्रण कक्षाच्या अहवालानुसार, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, यामुळे प्रवाशांमध्ये काही काळ घबराट पसरली.
हेही वाचा - राज्यात महायुतीत फूट? एकनाथ शिंदेंना 'या' प्राधिकरणात मिळाले नाही स्थान
मोबाईलच्या स्फोटामुळे धूर निर्माण झाला आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक यंत्रांचा वापर केला. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, कमी तीव्रतेचा स्फोट ऐकू आला. स्फोटामुळे डब्बा धुराने भरला, ज्यामुळे अनेक प्रवासी उतरण्यासाठी दाराकडे धावले. रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
हेही वाचा - Tanaji Sawant Son Kidnapping Case: मुलगा ऋषिराज सावंतच्या अपहरणाबाबत माजी मंत्री तानाजी सावंत यांचा खुलासा
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, 'ज्या महिलेचा मोबाईल फोन फुटला तिची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनेची चौकशी सुरू आहे. बॅटरीची समस्या किंवा इतर काही तांत्रिक समस्या असू शकते. सार्वजनिक वाहतुकीत इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरताना प्रवाशांनी काळजी घ्यावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.