Wednesday, September 03, 2025 11:52:24 PM

मोदी नागपुरातील शस्त्र निर्मिती कारखान्याला भेट देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावरून विशेष हेलिकॉप्टरने नागपूरजवळ असलेल्या बाजारगाव येथील सोलार एक्सप्लोझिव्ह शस्त्र निर्मिती कारखान्याला भेट देणार आहेत.

मोदी नागपुरातील शस्त्र निर्मिती कारखान्याला भेट देणार

नागपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर आहेत. आज सकाळीच पंतप्रधान मोदी नागपूरात दाखल झाले आहेत. नुकतच त्यांच्या हस्ते माधव नेत्रालय प्रीमियम केंद्राची पायाभरणी करण्यात आली आहे. नागपूर येथील सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विमानतळावरून विशेष हेलिकॉप्टरने नागपूरजवळ असलेल्या बाजारगाव येथील सोलार एक्सप्लोझिव्ह शस्त्र निर्मिती कारखान्याला भेट देणार आहेत.  

नागपूरच्या जवळ असलेल्या बाजारगाव येथे सोलार एक्सप्लोझिव्ह शस्त्र निर्मिती कारखाना आहे. या कारखान्याला पंतप्रधान मोदी भेट देणार आहेत. या कारखान्यात शस्त्रांची निर्मिती केली जाते. 

हेही वाचा : गुढीपाडव्यानिमित्त नागपूर मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

सोलार एक्सप्लोझिव्ह शस्त्र निर्मिती कारखान्याचे वैशिष्ट्ये 
सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड (SOIL) ही भारतातील आघाडीच्या स्फोटक उत्पादन कंपन्यांपैकी एक आहे. सोलर विविध प्रकारच्या औद्योगिक स्फोटके आणि स्फोटक बनवण्यासठी लागणाऱ्या प्रारंभिक उपकरणांची निर्मिती करते. कंपनीचे संपूर्ण भारतात 25 उत्पादन सुविधा आहेत. जागतिक स्तरावर सोलर इंडस्ट्रीजची उपस्थिती 51 हून अधिक देशांमध्ये आहे आणि 5 देशांमध्ये उत्पादन सुविधा आहेत. 24 फेब्रुवारी 1995 रोजी सोलर एक्सप्लोझिव्हज लिमिटेड या नावाने स्थापन झालेली ही कंपनी आता एक्सप्लोझिव्हजच्या क्षेत्रात 25 वर्षे उत्कृष्टता साजरी करत आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या कारखान्या भेट देणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जोरदार तयारी करण्यात आली आहे. हा कारखान नागपूरजवळ असलेल्या बाजारगाव परिसरात आहे. 


सम्बन्धित सामग्री