Thursday, August 21, 2025 05:40:25 AM

लाडक्या बहिणीचे पैसे, नवऱ्याची दारू आणि बायकोवर कोयत्याचा घाव

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पत्नीच्या बँक खात्यात जमा झालेले पैसे पतीने तिच्या परवानगीशिवाय काढून दारूवर उडवले. जेव्हा पत्नीने याविषयी जाब विचारला, तेव्हा पतीने संतापाच्या भरात पत्नीवर कोय

लाडक्या बहिणीचे पैसे नवऱ्याची दारू आणि बायकोवर कोयत्याचा घाव

सोलापूर: महाराष्ट्र सरकारची 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरु करण्यात आली. मात्र, या योजनेचे काही विपरीत परिणामही समोर येत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात एका व्यक्तीने पत्नीच्या लाडकी बहीण योजनेच्या पैशांवर दारू ढोसल्याचा धक्कादायक प्रकार उघडला. पत्नीने या पैशांबाबत जाब विचारताच संतापलेल्या पटीने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. 

काय आहे प्रकरण? 
माढा तालुक्यातील लोणी गावात ही घटना घडली. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पत्नीच्या बँक खात्यात जमा झालेले पैसे पतीने तिच्या परवानगीशिवाय काढून दारूवर उडवले. जेव्हा पत्नीने याविषयी जाब विचारला, तेव्हा पतीने संतापाच्या भरात पत्नीवर कोयत्याने वार केला. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा: पेट्रोल देण्यास नकार दिल्याने लोखंडी रॉड ने हल्ला, घटनेचं CCTV फुटेज व्हायरल

या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात पती आणि सासूविरोधात भारतीय दंड संहिता कलम 326 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

‘लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीवरून राजकीय वातावरणही तापले आहे. काही महिलांना योजनेचा खरोखर लाभ होत असताना, काही जण या पैशांचा गैरवापर करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. योजनेच्या अटींमध्ये बदल करून फोर व्हिलर असलेल्या कुटुंबातील महिलांची नावे वगळण्यात येत आहेत. आत्तापर्यंत 9 लाखांहून अधिक महिलांना विविध कारणांमुळे अपात्र ठरवण्यात आले आहे.


सम्बन्धित सामग्री