Wednesday, August 20, 2025 09:15:29 AM

Mumbai Stray Dog Complaints: मुंबईत भटक्या कुत्र्यांच्या 10 हजारहून अधिक तक्रारी; BMC ने मोबाईल अॅपद्वारे सुरू केली तक्रार यंत्रणा

बृहन्मुंबई महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांबाबत 10,778 तक्रारी नोंदवल्या आहेत. ही वाढती संख्या भटक्या कुत्र्यांशी संबंधित समस्यांबाबत वाढती सार्वजनिक चिंता दर्शवते.

mumbai stray dog complaints मुंबईत भटक्या कुत्र्यांच्या 10 हजारहून अधिक तक्रारी bmc ने मोबाईल अॅपद्वारे सुरू केली तक्रार यंत्रणा
Stray Dog
Edited Image

Mumbai Stray Dog Complaints: मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जानेवारी ते ऑगस्ट 2025 दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांबाबत 10,778 तक्रारी नोंदवल्या आहेत. ही वाढती संख्या भटक्या कुत्र्यांशी संबंधित समस्यांबाबत वाढती सार्वजनिक चिंता दर्शवते. यात रस्ते अपघात, रेबीज आणि इतर संसर्गांचा धोका यांचा समावेश आहे. आता बीएमसीने MyBMC मोबाइल अॅप्लिकेशन आणि अधिकृत वेबसाइटद्वारे एक सुलभ ऑनलाइन तक्रार यंत्रणा सुरु केली आहे. नागरिक आता नोंदणी करून आपली तक्रार, स्थान आणि समस्या सबमिट करू शकतात व SMS द्वारे संदर्भ क्रमांक प्राप्त करू शकतात. 

तक्रारींची तत्काळ कारवाई होण्यासाठी विभागांना आठवड्यातून तीनदा पुनरावलोकन करण्याचे निर्देश दिले आहेत. भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी मुंबईत 1994 पासून नसबंदी आणि रेबीज प्रतिबंधक मोहिमा राबविल्या जात आहेत. 2023 ते 2025 दरम्यान 4,20,345 कुत्र्यांची नसबंदी करण्यात आले आहे. बीएमसीच्या पशुवैद्यकीय विभागाअंतर्गत सात नसबंदी केंद्रे आणि फिरत्या सेवा कार्यरत आहेत, ज्यामुळे लोकसंख्या नियंत्रण आणि रेबीज लसीकरणावर भर देण्यात येतो. 

हेही वाचा - Mumbai Weather Forecast: मुंबईत आज मध्यम ते मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

नागरिकांना ऑनलाइन तक्रार करण्याचे आवाहन -  

दरम्यान, उच्च शहरी घनता, उघड्या कचऱ्याचे ढिगारे आणि सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खाऊ देणे यामुळे समस्या वाढत आहेत. अधिकारी नागरिकांना ऑनलाइन तक्रार पोर्टलचा उपयोग करण्याचे आवाहन करत आहेत, ज्यामुळे तक्रारींचे पद्धतशीर नोंदणी, सातत्यपूर्ण देखरेख आणि जलद कारवाई शक्य होईल.

हेही वाचा - Vasai-Virar Tragedy: वसईतील धुमाळ नगरमध्ये विहिरीत पोहताना 17 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

तथापी, बीएमसीचा विश्वास आहे की, समुदायाचा सक्रिय सहभाग जसे की कचरा योग्य ठिकाणी टाकणे, सार्वजनिक ठिकाणी खाऊ टाळणे आणि आक्रमक प्राण्यांची तक्रार करणे यामुळे मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या समस्यांवर नियंत्रण मिळवता येईल. या उपाययोजनांमुळे मुंबईत सुरक्षा आणि सार्वजनिक स्वच्छतेत हळूहळू सुधारणा अपेक्षित आहे.
 


सम्बन्धित सामग्री