Thursday, August 21, 2025 02:26:31 AM

खोडद दुर्बीण भरती प्रक्रिया गैरव्यवहाराबद्दल खासदार डॉ.अमोल कोल्हेंनी दिली माहिती

आशिया खंडातील सर्वात मोठा रेडिओ दुर्बीण प्रकल्प अशी ओळख असलेल्या खोडद ग्रामस्थांनी आज शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांची नारायणगाव येथे भेट घेत निवेदन दिले आहे.

खोडद दुर्बीण भरती प्रक्रिया गैरव्यवहाराबद्दल खासदार डॉअमोल कोल्हेंनी दिली माहिती

पुणे: आशिया खंडातील सर्वात मोठा रेडिओ दुर्बीण प्रकल्प अशी ओळख असलेल्या खोडद ग्रामस्थांनी आज शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांची नारायणगाव येथे भेट घेत निवेदन दिले आहे. जुन्नर तालुक्याच्या विकासाला पाचर ठोकणाऱ्या 'जीएमआरटी'चा जाहीर निषेध करत ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर 14 प्रश्न उपस्थित करत सध्या सुरू असणाऱ्या भरती प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहाराला वाचा फोडली आहे. दोन दिवसांपूर्वी  ग्रामस्थांनी एक विशेष ग्रामसभा घेत काही सवाल सुद्धा केले होते.

आज खासदार डॉ.कोल्हे यांची भेट घेतल्यानंतर डॉ कोल्हे यांनी सुद्धा या विषयात आपण जातीने लक्ष घालणार असल्याची माहिती दिली आहे. जीएमआरटीसारख्या (GMRT) आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रोजेक्टमध्ये खोडद ग्रामस्थांचं मोठं योगदान असताना कामगार भरती प्रक्रियेत स्थानिकांना पूर्णपणे डावलण्यात आलं आहे. एकूणच भरती प्रक्रियेत असंख्य त्रुटी असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.

हेही वाचा : गोंदिया जिल्हा परिषदेत महिलेची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार उघड

तसेच सिलेक्ट झालेले उमेदवार स्थानिक कर्मचाऱ्यांचे नातेवाईक असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या असून ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी प्रशासनाला उत्तर  द्यावे लागेल. संबंधित मंत्र्याना सुद्धा पत्रव्यवहार करून पारदर्शक पद्धतीने भरती व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती शिरुरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी दिली. 


सम्बन्धित सामग्री