Thursday, August 21, 2025 02:14:46 AM

एमएसएफ सिक्युरिटीची महिलेला विवस्त्र होईपर्यंत मारहाण; तुळजापूर तालुक्यात संतापाचं वातावरण

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात सिक्युरिटी महिलेला विवस्त्र होईपर्यंत मारहाण करण्यात आली आहे. या घटनेने परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी साधी तक्रारही घेतली नाही.

एमएसएफ सिक्युरिटीची महिलेला विवस्त्र होईपर्यंत मारहाण तुळजापूर तालुक्यात संतापाचं वातावरण

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात सिक्युरिटी महिलेला विवस्त्र होईपर्यंत मारहाण करण्यात आली आहे. या घटनेने परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी साधी तक्रारही घेतली नाही. त्यामुळे तुळजापूर ताुलक्यात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.  

धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथे मुलाला कामावरून का काढले म्हणून विचारण्यासाठी आणि शेतातील नुकसानीचा मोबदला मागण्यासाठी गेलेल्या महिला शेतकऱ्याला पवनचक्कीच्या एमएसएफ (MSF) सेक्युरिटीने बेदम मारहाण केली. महिला शेतकऱ्यासह तिच्या मुलाला विवस्त्र होईपर्यंत केलेल्या मारहाणी करण्यात आली. तुळजापूर तालुक्यामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मात्र पोलिसांनी प्रकरणाची तक्रार घेतली नसल्याने गंधोरा गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. महिलेला केलेल्या मारहाणीमुळे सेक्युरिटीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी गंधोरा येथील ग्रामस्थांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये आमची काही चूक नसल्याचे एमएसएफ (MSF) सिक्युरिटी इन्चार्जकडून सांगण्यात येत आहे. 

हेही वाचा : Bhiwandi Fire: भिवंडीतील भंगार गोदामाला भीषण आग; गोदाम जळून खाक

दरम्यान मारहाण करून 24 तास उलटून गेले तरीही पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार घेतली नाही. याउलट शेतकऱ्यांवरच गुन्हा दाखल करण्याची धमकी  पोलिसाने दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या शेतकरी महिला सुनिता दिगंबर सोनटक्के, पांडुरंग सोनटक्के, सहदेव सोनटक्के या तिघांवर नळदुर्गच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तुळजापूर तालुक्यामध्ये अनेकवेळा शेतकऱ्यावर पवनचक्कीच्या गुंड्यांकडून हल्ले करण्यात आले आहेत. आता महिला शेतकऱ्याला विवस्त्र होईपर्यंत मारहाणीचा व्हिडिओ समोर असतानाही पोलीस बघ्याची भूमिका का घेत आहेत असा प्रश्न परिसरातील ग्रामस्थ केला आहेत. 


सम्बन्धित सामग्री