Wednesday, August 20, 2025 08:43:35 PM

ST Bus App: ओला-उबरला टक्कर! एसटीचं स्वतःचं ॲप येणार; बुकिंगपासून पार्सलपर्यंत सर्व सेवा एका क्लिकवर

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आता बदलत्या काळाशी जुळवून घेत डिजिटल प्रवासाकडे मोठं पाऊल टाकत आहे. आर्थिकदृष्ट्या तोट्यात असलेल्या एसटीसाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार असून, मोबाईल ॲपच्य

st bus app ओला-उबरला टक्कर एसटीचं स्वतःचं ॲप येणार बुकिंगपासून पार्सलपर्यंत सर्व सेवा एका क्लिकवर

ST Bus App: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आता बदलत्या काळाशी जुळवून घेत डिजिटल प्रवासाकडे मोठं पाऊल टाकत आहे. आर्थिकदृष्ट्या तोट्यात असलेल्या एसटीसाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार असून, मोबाईल ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना ओला, उबर, रॅपिडोसारखी सहज सेवा मिळणार आहे. ही सुविधा सुरू झाल्यास एसटीच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

आता एसटी बुकिंग एका टॅपवर

नवीन मोबाईल ॲपमध्ये प्रवाशांना त्यांच्या लोकेशनवरून थेट वाहन बुक करण्याची सोय दिली जाणार आहे. केवळ एसटी बसेसच नव्हे, तर सहभागी खासगी कंपन्यांची वाहनेही या प्लॅटफॉर्मवर बुक करता येणार आहेत. यात बाइक, टॅक्सी, पार्सल डिलिव्हरीसारख्या सेवांचाही समावेश असणार आहे. प्रवाशांना ॲपवरून वाहनाची उपलब्धता, भाडे, ड्रायव्हरचा तपशील, तसेच प्रवासाचा अंदाजित वेळ अशा सर्व सुविधा एका क्लिकवर मिळणार आहेत.

एसटी महामंडळ होणार 'ऑपरेटर', मिळणार उत्पन्न

या ॲपच्या माध्यमातून एसटी महामंडळ केवळ सेवा पुरवणार नाही, तर ऑपरेटर म्हणूनही कार्य करणार आहे. ॲपवरून होणाऱ्या प्रत्येक बुकिंगवर महामंडळाला ठराविक मोबदला मिळेल. यामुळे एसटीला नियमित उत्पन्न मिळेल आणि संस्थेची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.

खाजगी कंपन्यांनाही संधी

या प्लॅटफॉर्मवर राज्यभरातील खाजगी वाहतूकदारही सहभागी होऊ शकतील. त्यामुळे लहान-मोठ्या टुरिस्ट गाड्या, ट्रॅव्हल कंपन्यांना नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे. सरकारी आणि खासगी भागीदारीद्वारे हे मॉडेल अधिक प्रभावीपणे राबवता येईल, अशी अपेक्षा आहे.

एसटी महामंडळाचं हे पाऊल केवळ प्रवाशांच्या सुविधेसाठी नाही, तर संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठं पाऊल ठरेल. मोबाईल ॲपच्या माध्यमातून 'टेक-फ्रेंडली' प्रवासाची सुरुवात करत, एसटी ओला-उबरला थेट टक्कर देण्यास सज्ज झाली आहे. आता केवळ प्रत्यक्षात ही सेवा कधी सुरू होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


सम्बन्धित सामग्री