मुंबई: देशभरात मान्सूनने जोर धरलेला असून महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा तडाखा सुरू आहे. तथापी, 24 जुलै रोजी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस बरसणार आहे. भारतीय हवामान विभागाने गुरुवारी मुंबई आणि कोकण परिसरात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वाहतूक विस्कळीत, अंधेरी सबवे बंद
मुंबईतील अनेक भागांत पावसामुळे पाणी साचले असून अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. आज समुद्रात 4.37 मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तसेच नागरिकांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.
हेही वाचा - Chhtrapati Sambhajinagar: महिलेची हात जोडून विनंती; सोनोग्राफीचा डॉक्टर मात्र गाढ झोपेत
संरक्षक भिंत कोसळल्याने पाच घरे जमीनदोस्त -
बुधवारी मुंबईतील भांडुपमधील खिंडीपाडा परिसरात पावसामुळे टेकडीची संरक्षक भिंत कोसळल्याने पाच घरे जमीनदोस्त झाली. सुदैवाने, स्थानिक प्रशासनाच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेचा व्हिडिओही समोर आला असून, ढिगाऱ्यांचे दृश्य आणि उद्ध्वस्त घरांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या भागात दाट लोकवस्ती असल्याने संभाव्य धोका अधिक होता.
हेही वाचा - Sambhajinagar: ऐन पावसाळ्यात 79 टँकर सुरू; अजूनही 49 गावांना टंचाईच्या झळा
दिल्ली-एनसीआरमध्येही दमट वातावरण
तथापी, राजधानी दिल्लीतही पावसाचे सत्र सुरू असून, वातावरणात दमट उष्णता जाणवत आहे. बुधवारी संध्याकाळी जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर, गुरुवारी शहरात ढगाळ हवामान आणि हलक्या सरी बरसल्या.