Monday, September 01, 2025 01:41:06 AM

Nagpur-Gondia Expressway: नागपूर-गोंदिया एक्सप्रेसवे प्रकल्पाला हिरवा कंदील; 3 तासांचा प्रवास फक्त 75 मिनिटांत पूर्ण होणार

या प्रकल्पामुळे नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील 10 तालुके आणि 115 गावांना थेट फायदा होणार आहे. तसेच, हा महामार्ग नागपूर व मुंबईसारख्या मोठ्या शहरांना मागास आणि आदिवासी बहुल भागांना जोडेल.

nagpur-gondia expressway नागपूर-गोंदिया एक्सप्रेसवे प्रकल्पाला हिरवा कंदील 3 तासांचा प्रवास फक्त 75 मिनिटांत पूर्ण होणार

Nagpur-Gondia Expressway: गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र सरकारने राज्यातील जनतेला मोठी भेट दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नागपूर-गोंदिया एक्सप्रेसवे प्रकल्पाला हिरवा कंदील देण्यात आला. सरकारचे म्हणणे आहे की, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नागपूर ते गोंदिया प्रवासाचा वेळ तीन तासांवरून केवळ 75 मिनिटांपर्यंत कमी होईल.

3162 कोटींचे बजेट

प्राप्त माहितीनुसार, 162.5 किमी लांबीचा हा एक्सप्रेसवे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) सोपवण्यात आला आहे. भूसंपादनासाठी 3162.18 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, बांधकामासाठी स्वतंत्र निधी देण्यात येणार आहे. 

हेही वाचा - Mumbai Rains Today Updates: मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अर्लट जारी; हवामान विभागाकडून हलक्या पावसाचा अंदा

विकासाला चालना

या प्रकल्पामुळे नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील 10 तालुके आणि 115 गावांना थेट फायदा होणार आहे. तसेच, हा महामार्ग नागपूर व मुंबईसारख्या मोठ्या शहरांना मागास आणि आदिवासी बहुल भागांशी जोडेल. या महामार्गावर एकूण 26 उड्डाणपूल, 15 मोठे पूल, 63 लहान पूल, 78 कालवे क्रॉसिंग, तसेच प्राण्यांसाठी 8 अंडरपास असतील. 

हेही वाचा - Manoj Jarange Patil Big news : मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आंदोलन करणार; या 3 मुख्य अटींसह सशर्त परवानगी

आर्थिक-सामाजिक परिणाम

सरकारचा विश्वास आहे की, हा प्रकल्प केवळ प्रवास जलद आणि सोपा करणार नाही, तर नवीन उद्योगांना चालना, स्थानिक विकासाला गती, तसेच तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देईल.


सम्बन्धित सामग्री